📚 राज्यसेवा परीक्षेच्या दृष्टीने भूगोल हा विषय अभ्यासणे अगत्याचे ठरते. आज आपण या विषयातील 'भूरूपशास्त्र' हा मुद्दा अभ्यासणार आहोत.
🔍 पृथ्वीवरील उंचसखलतेचा व भूविशेषांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूरूपशास्त्र होय. हे शास्त्र पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उंचसखलतेमूळे निर्माण होणाऱ्या भूविशेषांचे वर्णन व विवरण करणारे शास्त्र आहे. भूरूपांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत :
▪ मैदान : कमी उंची असलेल्या, जमिनीच्या सपाट भागाला मैदान असे म्हणतात.
▪ टेकडी : आजूबाजूच्या सपाट जमिनीपेक्षा उंच असलेल्या भागाला टेकडी असे म्हणतात.
▪ डोंगर : तीव्र उत्तर असलेल्या आणि टेकाडीपेक्षाही उंच असलेल्या जमिनीच्या भागाला डोंगर म्हणतात.
▪ पर्वत : डोंगरापेक्षाही जास्त उतार असणाऱ्या जमिनीच्या उंच भागाला पर्वत असे म्हणतात.
▪ शिखर : डोंगराचा अथवा पर्वताचा माथ्याकडे अरुंद होत गेलेला भाग म्हणजे शिखर होय.
▪ पठार : आजूबाजूच्या भूभागापेक्षा उंच असलेला परंतु माथ्याचा भाग सपाट असलेल्या जमिनीच्या भागाला पठार म्हणतात.
▪ दरी : पर्वत किंवा डोंगरामधील लांब पसरलेल्या खोल भागास दरी असे म्हणतात.
▪ खिंड : दोन डोंगर किंवा पर्वतांच्या मधील कमी उंचीच्या अरुंद भागाला खिंड असे म्हणतात.
▪ बेट : सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या भूभागाला बेट असे म्हणतात.
No comments:
Post a Comment