2 ची कसोटी :
– ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात.
– उदा. 42, 52 68, 86, 258, 1008 इ.
3 ची कसोटी :
– ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो, त्या संख्येला तीनने भाग जातो.
– उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
– संख्येची बेरीज 27 आणि तिला तीनने भाग जातो म्हणून त्या संख्येला तीनने भाग जातो.
4 ची कसोटी :
– ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना चार ने भाग जातो. त्या संख्येला चारने भाग जातो.
– उदा. 3568912
– शेवटचे दोन अंक 12 आणि त्याला चारने भाग जातो म्हणून त्या संख्येला चारने भाग जातो.
5 ची कसोटी :
– ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किवा 5 असेल, त्या संख्येला पाचने भाग जातो.
– उदा. 3725480, 58395, 5327255 इ.
6 ची कसोटी :
ज्या संखेळा 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पण भाग जातो.
9 ची कसोटी :
– ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला नऊने भाग जातो, त्या संख्येला नऊने भाग जातो.
– उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
– संख्येची बेरीज 27 आणि तिला नऊने भाग जातो म्हणून त्या संख्येला नऊने भाग जातो.
10 ची कसोटी :
– ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10 ने भाग जातो.
– उदा. 100, 60, 5640, 57480, 354748, 3450 इ.
11 ची कसोटी :
– ज्या संख्येतील फरक 0 किवा ती संख्या 11 च्या पटीतील असेल तर त्या संख्येस 11 ने भाग जातो.
– उदा. 956241 1+2+5=8 & 9+6+4=19 दोघातील फरक 11 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
– 72984 4+9+7=20 & 8+2=10 दोघांतील फरक -10 म्हणून या संख्येला 11 ने भाग जात नाही.
– 5984 4+9=13 & 5+8=13 दोघांतील फरक 0 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
12 ची कसोटी :
– ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो.
15 ची कसोतो :
– ज्या संख्येला 5 आणि 3 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो.
16 ची कसोटी :
– ज्या संखेच्या शेवटच्या चार अंकांना 16 ने भाग गेल्यास त्या संख्येला पण 16 ने भाग जातो.
18 ची कसोटी :
– ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो.
उदाहरणे :
1) 2 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
1. 3721
2. 47953
3. 72142
4. 68325
उत्तर : 72142
नियम: संख्येतील एकक स्थानचा अंक सम असल्यास 2 ने नि:शेष भाग जातो.
2) 3 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
1. 37241
2. 571922
3. 7843
4. 64236
उत्तर : 64236
नियम:
संख्येतील अंकांच्या बेरजेस 3 ने पूर्ण भाग गेल्यास
6+4+2+3+6=21÷3 = 7
3) 5 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
1. 56824
2. 9876
3. 7214
4. 7485
उत्तर : 7485
नियम: संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 असल्यास 5 ने नि:शेष भाग जातो.
4) 6 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
1. 3472
2. 5634
3. 9724
4. 6524
उत्तर : 5634
5) 9 ने नि:शेष भाग जाणारी खालील पैकी संख्या कोणती?
1. 12643
2. 85521
3. 75636
4. 54829
उत्तर : 75636
(ब) संख्यांचे विभाजक
नमूना पहिला –
1) 60 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या किती?
1. 10
2. 12
3. 14
4. 8
उत्तर : 12
स्पष्टीकरण :-
कोणत्याही सम संख्येचे विभाजक 1,2 व ती संख्या असतेच.
60×1, 30×2, 20×3, 15×4, 12×5, 10×6
:: 6×2 = 12
नमूना दूसरा –
1) 36 ही संख्या दोन पूर्ण संख्यांचा गुणाकाराच्या रूपात जास्तीत जास्त किती प्रकारे (वेळा) लिहिता येईल?1. 4
2. 6
3. 5
4. 8
उत्तर : 5
स्पष्टीकरण :
1×36, 2×18, 3×12, 4×9, 6×6 म्हणजेच एकूण 5 वेळा लिहिता येईल.
No comments:
Post a Comment