Sunday, 6 October 2019

दिल्लीत ‘स्वच्छ पाणी अभियान’चा शुभारंभ

दिनांक 4 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी नागरिकांना सुरक्षित पेयजल उपलब्ध व्हावे या हेतूने ‘स्वच्छ पाणी अभियान’ राबवविण्यास सुरुवात केली आहे. प्रारंभी हे अभियान दिल्ली क्षेत्रात राबवविले जाणार आहे आणि हळूहळू ते राष्ट्राव्यापी करण्याची योजना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आरंभ करण्यात आलेले 'स्वच्छ भारत अभियान' आणि 2024 सालापर्यंत घराघरात नळाद्वारे पिण्याचे पाणी पोहचविण्याचे ध्येय यांच्या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छ पाणी अभियान' किंवा ‘क्लीन वॉटर मिशन’ हा कार्यक्रम राबवविला जाणार आहे.

पार्श्वभूमी

राजधानी दिल्लीत 11 ठिकाणांहून भारतीय मानक विभागाने (BIS) संकलित केलेल्या पिण्याच्या पाण्याचे नमुने pH पातळी, गंध, धातूची उपस्थितो यासारख्या वेगवेगळ्या मापदंडांवर आवश्यक असणारी मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे दिल्ली जल विभागाने असे अभियान दिल्लीत राबवविण्याची कल्पना मांडली.

आता देशभरात पेयजलाच्या संदर्भात निकष अनिवार्य केले जाऊ शकतात किंवा नाही याचा शोध भारत सरकार घेत आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून BIS, भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण (FSSAI) आणि जलशक्ती मंत्रालय याबाबत चर्चा करीत आहेत. तसेच देशातल्या राज्य सरकारांकडून यासंदर्भात त्यांचे मत मागविण्यात आले आहे आणि राज्यातल्या विविध ठिकाणांहून नमुने मागविण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...