◾️मुळचा बीडचा आणि सध्या भारतीय लष्करात हवालदार पदावर काम करणाऱ्या,
◾️अविनाश साबळेने दोहा येथे सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ३००० मी. स्टीपलचेस शर्यतीत सर्वोत्तम वेळ नोंदवत टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे.
◾️अविनाशने आपला राष्ट्रीय विक्रम मोडत ८:२१:३७ अशी वेळ नोंदवली. ३००० मी. शर्यतीत नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची अविनाशची गेल्या वर्षभरातली ही चौथी वेळ ठरली आहे.
◾️अंतिम फेरीत अविनाश तेराव्या स्थानावर राहिला.
◾️२०१८ साली जून महिन्यात गुवाहटी येथे झालेल्या आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत अविनाशने ८:४९:२५ अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली होती.
◾️ यानंतर फेडरेशन कप आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या कामगिरीत सुधारणा करत अविनाशने ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे.
No comments:
Post a Comment