Tuesday, 8 October 2019

श्रीलंकेचे अध्यक्ष सिरीसेना निवडणुकीच्या रिंगणाबाहेर

पूढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार नसल्याचे विद्यमान अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीमध्ये माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या दोन भावांनी अर्ज दाखल केला आहे.

- श्रीलंकेत १६ नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी रविवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता आणि त्यामध्ये ४१ उमेदवारांनी अर्ज भरले. सिरीसेना यांच्या श्रीलंका फ्रीडम पक्षानेही सिरीसेना निवडणूक लढविणार नसल्याचे म्हटले आहे. या निवडणुकीत महिंदा राजपक्षे यांचे दोन भाऊ गोटबाया आणि चमल यांनीही अर्ज भरले आहेत. तर, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे युनायटेड नॅशनल पक्षाकडून साजिथ प्रेमदासा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

-  गोटबाया यांनी महिंदा राजपक्षे अध्यक्ष असताना, संरक्षण मंत्रिपद भूषविले आहे. त्यामुळे, त्यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र त्यांच्याविरोधात अनेक खटले प्रलंबित असून, त्यामध्ये नागरिकत्वाचेही प्रकरण आहे. त्यामुळे चमल यांनीही अर्ज भरला आहे.

▪️विक्रमसिंघे यांच्यासोबत वाद

सिरीसेना यांनी गेल्या निवडणुकीमध्ये विक्रमसिंघे यांना हाताशी धरत, राजपक्षे यांच्या पक्षाचा पराभव केला होता. मात्र, सिरीसेना आणि विक्रमसिंघे यांच्यामध्येही वाद आहेत. गेल्या वर्षी सिरीसेना यांनी रानिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून बडतर्फ केले होते आणि महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधान पदावर आणले होते. सुप्रीम कोर्टाने त्यांचा हा निर्णय घटनाबाह्य ठरवला होता आणि त्यावरून घटनात्मक पेच निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर, सिरीसेना यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
——————————————————————-

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...