Wednesday, 16 October 2019

मराठमाेळ्या सौरभ अम्बुरेला मिळाला राफेल उडवण्याचा पहिला मान

📌 लातूर जिल्ह्यातील उदगीरचे शत्रूला धडकी भरवणारे 'राफेल' हे अत्याधुनिक लढाऊ विमान विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भारतीय वायुदलात सहभागी झाले. उदगीरात बालपण गेलेल्या भारतीय हवाई दलातील मराठमोळे स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांस अत्याधुनिक लढाऊ विमान 'राफेल' उडवण्याचा पहिला मान मिळालेला आहे.

📌 भारतीय वायुदलामध्ये अत्याधुनिक लढाऊ विमान राफेल सहभागी झाल्याचा आनंद भारतीयांना झालेला आहे. परंतु राफेल विमान उडवण्याचा पहिला मान उदगीरात बालपण गेलेल्या स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांना मिळाल्याने येथील नागरिकांतून आनंद व्यक्त होत आहे.

📌 स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांचे उदगीर हे आजोळ आहे. कर्नाटकातील बिदर हे त्यांचे मूळ गाव असले तरी त्यांचे आई-वडील दोघेही उदगीर येथे एका राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये नोकरीस होते. त्यामुळे अम्बुरे कुटुंबीय उदगीरात वास्तव्यास होते.

📌स्क्वाड्रन लीडर सौरभ अम्बुरे यांचे प्राथमिक शिक्षण येथील विद्यावर्धिनी इग्लिश स्कूल येथे झालेले आहे त्यानंतर त्याचे पुढील शिक्षण हे सातारा सैनिक स्कूल येथे झाले आहे. स्क्वाड्रन लीडर अम्बुरे यांचे आई-वडील सध्या हैदराबाद येथे राहत असल्याचे त्यांच्या उदगीर येथील आजोळमधील नातलगांनी सांगितले.....

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...