Thursday, 3 October 2019

स्वच्छता सर्वेक्षणात राजस्थानमधील तीन रेल्वे स्थानकांनी स्वच्छतेसाठी सर्वोत्कृष्ट

♻️ मुंबईतील ३ उपनगरीय स्थानकेही अव्वल

♻️ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी जाहीर केलेल्या रेल्वेच्या स्वच्छता सर्वेक्षणात राजस्थानमधील तीन रेल्वे स्थानकांनी स्वच्छतेसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मान मिळवला. उपनगरीय स्थानकांमध्ये हा मान मिळवणाऱ्यांत मुंबईतील ३ स्थानके आहेत.

♻️ रेल्वेच्या देशभरातील ७२० स्थानकांपैकी जयपूर, जोधपूर व दुर्गापुरा या तीन स्थानकांनी यादीत पहिल्या तीन क्रमांकांवरील स्थान पटकावले. १०९ उपनगरीय स्थानकांपैकी मुंबईतील अंधेरी, विरार व नायगाव ही तीन स्थानके पहिल्या तीन क्रमांकांची ठरली.

♻️ रेल्वेचा विभागनिहाय विचार करता, उत्तर पश्चिम रेल्वेने पहिला क्रमांक मिळवला. त्याखालोखाल दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि पूर्व मध्य रेल्वे यांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक

♻️ २०१६ सालापासून रेल्वे देशभरातील ४०७ महत्त्वाच्या स्थानकांच्या स्वच्छतेबाबत तटस्थ यंत्रणेकडून अंकेक्षण करून त्यांची क्रमवारी जाहीर करत असते.

♻️ या वर्षी याचा ७२० स्थानकांपर्यंत विस्तार करण्यात येऊन पहिल्यांदाच उपनगरीय स्थानकांचाही समावेश.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...