◾️2018 साठी साहित्याचा नोबेल
पुरस्कार
📌पोलिश लेखिका ओल्गा टोकार्झुक आणि
◾️ 2019 मधील नोबेल पुरस्कार
📌ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हॅण्डके यांना जाहीर झाला आहे.
◾️स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये स्विडीश अकादमीने आज (10 ऑक्टोबर) याची घोषणा केली.
◾️ मागील वर्षी लैंगिक छळाच्या प्रकरणामुळे 2018 च्या साहित्याच्या नोबेल पुरस्काराची घोषणा स्थगित केली होती.
🌸 साहित्याच्या नोबेल पुरस्कारशी संबंधित गोष्टी 🌸
◾️ 1901 पासून 2017 पर्यंत 110 नोबेल पुरस्कार देण्यात आले आहेत.
◾️114 साहित्यिकांना सन्मानित करण्यात आलं आहे.
◾️सर्वाधिक इंग्लिश भाषेसाठी (23 वेळा) साहित्याचा नोबेल देण्यात आला आहे.
◾️साहित्याचा नोबेल चार वेळा दोन साहित्यिकांना संयुक्तरित्या देण्यात आला आहे.
📌1914,
📌1918,
📌1935,
📌1940,
📌1941,
📌1942 आणि
📌1943 मध्ये
याची घोषणा झाली नाही.
◾️ब्रिटीश पत्रकार रुडयार्ड किपलिंग (तेव्हा 41 वर्ष) हे साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण साहित्यिक ठरले.
◾️ त्यांना 1907 मध्ये 'जंगल बुक'साठी हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचा जन्म मुंबईत झाला होता.
◾️तर साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारे सर्वात ज्येष्ठ साहित्यिक या ब्रिटनच्या डोरिस लेसिंग (88 वर्ष) होत्या. त्यांना 2007 मध्ये हा पुरस्कार मिळाला.
◾️14 लेखिकांचा साहित्याच्या नोबेल पुरस्काराने सन्मान झाला आहे.
◾️नोबेल मिळवणाऱ्या स्वीडिश लेखिका सेलमा लेगरलोफ या पहिल्या साहित्यिका होत्या, त्यांना 1909 मध्ये हा पुरस्कार प्रदान केला होता.
◾️ भारतातील बंगाली साहित्यिक रविंद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये 'गीतांजली' या काव्य संग्रहासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला.
◾️नोबेल पुरस्कार मिळवणारे टागोर हे भारतातीलच नाही तर आशियातील पहिले व्यक्ती होते.
◾️मागील वर्षी लैंगिक छळाचा प्रकरणामुळे 2018 चा साहित्याच्या नोबेलची घोषणा अकादमीने स्थगित केली होती.
◾️त्यामुळे यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन साहित्यिकांना देण्यात आला.
No comments:
Post a Comment