Wednesday, 16 October 2019

आशियातील सर्वात लांब ‘चेनानी-नाशरी’ बोगद्याला श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देणार

◾️केंद्र सरकारने आशियातील सर्वात लांब बोगदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘चेनानी-नाशरी’ बोगद्यास जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. 

◾️केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी यासंदर्भात घोषणा केली. यावेळी गडकरी यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्ग-४४ वर तयार करण्यात आलेला या बोगद्याला आता श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे नाव दिले जाणार आहे.

◾️ ज्यांनी देशासाठी ‘एक निशान, एक विधान व एक प्रधान’ हा मंत्र दिला होता.

◾️जम्मू – श्रीनगर महामार्गावरील रामबन जवळ असलेल्या चेनानी-नाशरी बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २०१७ मध्ये झाले होते. तर, 

◾️या बोगद्याच्या निर्मिती कार्याची सुरूवात, २३ मे २०११ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात करण्यात आली होती. 

◾️२०१७ मध्ये याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा राष्ट्राला अर्पण करण्यात आला होता.

◾️ तब्बल १ हजार २०० मीटर उंचीवर व साधारण ९.०२ किलोमीटर लांब असलेल्या या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील अंतर ४० किलोमीटरने कमी झाले आहे. म्हणजेच प्रवासाचा वेळ साधारण दोन तासांनी वाचत आहे.

◾️दोन लेनचा हा बोगदा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा बोगदा म्हणून ओळखला जातो.

◾️ हा बोगदा बांधण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागला. खराब हवामान असताना जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद केला जातो. 

◾️हा बोगदा मात्र कधीही बंद करावा लागणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

◾️ उधमपूर जिल्ह्यातील चेनानी येथे सुरू होऊन हा बोगदा रामबन जिल्ह्यातील नाशरी येथे बाहेर पडतो. 

◾️या बोगद्याच्या निर्मितीसाठी एकूण १ हजार ५०० अभियंते, भूगर्भतज्ज्ञ आणि कामगारांनी मेहनत घेतली आहे. तर, 

◾️यासाठी एकूण ३ हजार ७२० कोटी रुपये इतका खर्च आला आहे.

◾️ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बोगद्याची निर्मिती केली आहे.

◾️ बोगद्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी सुमारे १२४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास कंट्रोल रूमकडून तत्काळ वाहतूक पोलिसांना त्यांची माहिती मिळते.

◾️दोन लेनवर २९ क्रॉस पॅसेज देण्यात आले आहेत. प्रत्येक ३०० मीटर अंतरावर एक पॅसेज आहे.

◾️ याचबरोबर बोगद्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणूनही योग्य ती खबरदारी देखील घेण्यात आली आहे. एवढेच नाहीतर आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास बोगद्यात वाहनतळाची देखील व्यवस्थाही करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...