Tuesday, 1 October 2019

एमसीसी अध्यक्षपदी संगकारा

◾️ऐतिहासिक मेरलिबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) अध्यक्षपदाची सुत्रे श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने स्वीकारली आहेत

◾️. या मानाच्या क्लबमध्ये अध्यक्ष होणारा संगकारा हा पहिला ब्रिटिशेतर खेळाडू ठरला आहे. गेल्या मे महिन्यातच मावळते अध्यक्ष अँथनी रेफर्ड यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत संगकाराच्या नावाची घोषणा केली होती.

◾️‘एमसीसीसारख्या अतिउच्च अन् मानाच्या क्लबचा अध्यक्ष होणे ही माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाची बाब आहे.

◾️एमसीसीचे मावळते अध्यक्ष रेफर्ड म्हणाले, ‘सध्याच्या घडीला एमसीसीच्या अध्यक्षपदासाठी संगकारापेक्षा सरस व्यक्ती असूच शकत नाही.

◾️क्रिकेट या खेळाची ताकद आणि या खेळाची प्रेक्षकांना बांधून ठेवणारी उत्कंठा संगकाराला ठाऊक आहे.

◾️एमसीसीच्या मार्फत क्रिकेटच्या प्रसारासाठी जे कार्य सुरू असते, त्याचा ब्रँडअॅम्बेसिडर म्हणून संगाकारा योग्य व्यक्ती आहे’.

◾️१३४ कसोटींमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ४१ वर्षांच्या संगकाराचे एमसीसी क्लबशी असलेले नाते जुनेच आहे.

◾️२००२मध्ये इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करताना या क्लबविरुद्ध खेळला

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...