विवेक एक्सप्रेस
ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन आहे. कन्याकुमारी, तमिळनाडूवरून डिब्रूगढ, आसामपर्यंत जाते. ही ट्रेन 4 हजार 273 किमी चालते आणि 85 तासात आपला प्रवास पूर्ण करते. या ट्रेनच्या प्रवासा दरम्यान तुम्हाला पश्चिम बंगालपासून केरळपर्यंतचं निसर्ग सौंदर्य पाहाल.
हिमसागर एक्सप्रेस
ही भारतातली सर्वात लांब पल्ल्याची दुसरी ट्रेन आहे. ही ट्रेन 3 हजार 714 किमी चालते. उत्तरेतील जम्मूपासून दक्षिणेतील कन्याकुमारीपर्यंत ही ट्रेन नऊ राज्यांमधून जाते. या ट्रेनमध्ये बसून तुम्ही या नऊ राज्यांचं सौंदर्य पाहू शकता.
नवयुग एक्सप्रेस
आठवड्याला एक दिवस धावणारी ही ट्रेन जम्मूतवीपासून मँगलोरपर्यंत जाते. ही देशातील तिसऱ्या नंबरची सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन आहे. ही ट्रेन 12 राज्यांमधून जाते. या ट्रेनमधून तुम्ही जवळपास अर्ध्या भारताचा प्रवास करू शकता.
गुवाहाटी एक्सप्रेस:
ही भारतातली लांब पल्ल्याची चौथ्या नंबरची ट्रेन आहे. ही ट्रेन यशवंतपुर, बँगलोरपासून सुरू होऊन डिब्रूगढ, आसामपर्यंत जाते. आठवड्याला एकदा धावणारी ही ट्रेन तीन दिवसांचा प्रवास करते.
No comments:
Post a Comment