Sunday, 13 October 2019

गंगा नदीतल्या डॉल्फिन मास्यांच्या वार्षिक गणनेस प्रारंभ

- उत्तरप्रदेश वनविभागाच्या सहकार्याने ‘वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर-इंडिया’ (WWF-India) या संस्थेच्या वतीने गंगा नदीतल्या डॉल्फिन मास्यांच्या वार्षिक गणनेचा कार्यक्रम राबविण्यास बिजनौरमध्ये प्रारंभ केला गेला आहे.

- ही गणना हस्तिनापूर वन्यजीवन अभयारण्य आणि नरोरा रामसार स्थळाच्या दरम्यान गंगा नदीच्या वरच्या पात्रात सुमारे 250 किलोमीटर लांबीच्या पात्रात केली जाणार आहे.

▪️ अन्य ठळक बाबी

-गंगा नदीतल्या डॉल्फिन मास्यांची सध्या एकूण संख्या 2500 ते 3000 याच्यादरम्यान आहे, त्यातले 80 टक्क्यांहून अधिक गंगा व त्याच्या उपनद्यात वास्तव्यास आहेत.

- या कार्यक्रमाचा भाग म्हणून राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) याच्यावतीने 12 ऑक्टोबर 2019 रोजी 2030 सालापर्यंत डॉल्फिनची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने योजना तयार करण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

- ऑक्टोबर 2009 मध्ये भारत सरकारने गंगा नदीतल्या डॉल्फिनला 'राष्ट्रीय जलचर प्राणी' घोषित केले होते.

▪️डॉल्फिन मासा

- हा एक सस्तन प्राणी आहे. डॉल्फिनाचा समावेश अपरास्तनी उपवर्गाच्या सीटॅसिया गणात करण्यात येतो. या गणात व्हेल, शिंशुक (पॉरपॉईज) यांचाही समावेश करतात. सीटॅसिया गणात असलेल्या डेल्फिनिडी कुलामध्ये डॉल्फिनाच्या 17 प्रजाती आणि 40 जाती आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत सागरात आढळणाऱ्या डॉल्फिनाचे शास्त्रीय नाव ‘टर्सिओप्स ट्रंकेटस’ आहे. स्थानिक मराठी भाषेत याला बुलुंग व मामा असेही म्हणतात. समुद्रकिनाऱ्यालगतच्या उथळ पाण्यात ते आढळतात. मायोसीन कालखंडात (सुमारे 1 कोटी वर्षांपूर्वी) ते उत्क्रांत झाले असावेत, असे मानतात. डॉल्फिन पाण्यात तसेच पाण्याबाहेर राहू शकतो. त्यांची श्रवणेंद्रिये तीक्ष्ण असतात. मनुष्याला ज्या कंप्रतेचा ध्वनी ऐकू येतो त्याहून दहापट कंप्रतेचा ध्वनी त्याला ऐकू येतो.

- गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, बियास व सतलज या नद्यांमध्ये गोड्या पाण्यातले डॉल्फिन सापडतात. प्लॅटिनिस्टा गँजेटिका आणि प्लॅटिनिस्टा गँजेटिका मायनर या त्यांच्या गोड्या पाण्यातल्या जाती आहेत. शरीरशास्त्रीय दृष्ट्या गंगा नदीतले डॉल्फिन अंध आहेत कारण त्यांच्या डोळ्यात नेत्रभिंग नसते. त्यांना प्रकाशाची दिशा आणि तीव्रतेचे ज्ञान होत असते. हालचाल व शिकारीसाठी ते फक्त प्रतिध्वनी स्थान निर्धारण तंत्राचा वापर करतात. नद्यांवर बांध आणि धरणे यांमुळे ते विखुरले गेले आहेत. डॉल्फिनाच्या संरक्षणासाठी भारत सरकारने चंबळ जल अभयारण्य स्थापन केले आहे.
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...