बँक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंडसइंड बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश सोबती यांना एक्स्प्रेस समूहातील ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’द्वारे आयोजित सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- बजाज फिनसव्र्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांना ‘बँकर ऑफ द इयर’ने गौरविण्यात आले.
- देशाच्या बँक, वित्त क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानाचा समजले जाणाऱ्या ‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कारांचे वितरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते येथे झाले. यावेळी एक्स्प्रेस समूहाचे अध्यक्ष विवेक गोएंका उपस्थित होते. ‘एजीएस’ प्रस्तुत, रुणवाल व केसरी सहयोगी भागीदार असलेल्या तसेच ईवाय हे ‘नॉलेज प्रोव्हायडर’ असलेल्या या पुरस्कार सोहळ्यात विविध गटात बँक, वित्त तसेच सेवा उत्पादन, तंत्रस्नेही वित्तीय मंचांना सन्मानित करण्यात आले.
- रमेश सोबती हे जीवनगौरव पुरस्काराचे तर बजाज समूहातील बजाज फिनसव्र्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज हे ‘बँकर ऑफ द इयर’चे मानकरी ठरले. राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक व विदेशी बँक गटात अनुक्रमे इंडियन बँक, एचडीएफसी बँक आणि एचएसबीसी बँक विजेत्या ठरल्या.
-- इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ही लहान वित्त बँकांच्या गटातील तर बजाज फायनान्स व क्रेडिटएक्सेस ग्रामीण हे गैर बँकिंग वित्त कंपनी गटात अव्वल ठरले. गृह कर्ज उत्पादन श्रेणीत स्टेट बँक, बचत उत्पादन श्रेणीत कोटक महिंद्र बँक सर्वोत्कृष्टतेच्या मानकरी ठरल्या. तंत्रस्नेही वित्तीय मंचांच्या गटात (डिजिटल बँक) अॅक्सिस बँक व (फिनटेक) रेझरपे, क्रेडिटविद्या, लोन फ्रेम, अॅको जनरल इन्शुरन्स, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) हे पुरस्कारपात्र ठरले.
——————————————————————--
No comments:
Post a Comment