Monday, 7 October 2019

'आरे'आंदोलनः २९ पर्यावरणवाद्यांना अखेर जामीन

- आरे मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण प्रेमी आणि 'आरे वाचवा' मोहिमेतील आंदोलनकर्त्या २९ जणांना कोर्टाने आज जामीन मंजूर केला आहे. पर्यावरण प्रेमी आणि आरे वाचवा मोहिमेसाठी आंदोलन करणाऱ्या ३८ जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. या सर्वांना बोरिवलीच्या कोर्टात हजर केले असता २९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

- मबुईतील आरे मेट्रो कारशेड प्रकरणी शुक्रवारी हायकोर्टाचा निकाल पर्यावरणवाद्यांच्या विरोधात जाताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन झाडे कापण्याचा प्रकार समोर आला. पर्यावरण प्रेमी आणि 'आरे वाचवा' मोहिमेच्या आंदोलकांना याची माहिती मिळताच त्यांनी रात्रीपासून या ठिकाणी धाव घेत आंदोलन सुरू केले. पोलिसांनी आज आंदोलन करणाऱ्या ३८ जणांना अटक केली. या सर्वांना कोर्टात हजर केले असता यातील २९ जणांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच ५५ जण ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेली तत्काळ याचिका आज दाखल करून घेण्यास हायकोर्टाने नकार दिल्याने पर्यावरणप्रेमींना मोठा झटका बसला आहे.

- गोरेगाव हायवेपासूनच पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. लोकांना आरे परिसरात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. मुंबई 'मेट्रो ३'चे कारशेड आरे कॉलनीत बनविण्याच्या व त्यासाठी तेथील २ हजार ६५६ झाडे तोडण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्या. तसेच, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने तिथे दाद मागा, असे न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सांगितले होते. रात्रीच्या सुमारास झाडे तोडण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...