Sunday, 6 October 2019

भूगोल प्रश्नसंच 6/10/2019

1) .................... अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे खोडांच्या आणि मुळांच्या टोकांवर दिसून येतात.
   1) नत्र आणि गंधक    2) बोरॉन आणि चुना   
  3) मॅग्नेशियम आणि लोह    4) पालाश आणि स्फुरद
उत्तर :- 2

2) किसान क्रेडिट कार्ड योजना संपूर्ण देशात लागू झाली असून या योजनेखाली शेतीविषयक कामांकरिता कर्ज दिले जाते. या
     योजनेबाबत काय खरे नाही ?
   अ) ही योजना केवळ सहकारी बँक व क्षेत्रीय ग्रामीण बँकांव्दारे अंमलात आणली जाते.
   ब) या योजनेंतर्गत केवळ शेती करण्यावस्तव लागणा-या बाबींच्या वापरासाठी कर्ज दिले जाते परंतु मुदतीचे कर्ज दिले जात नाही.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 3

3) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे.
   अ) भात पिकास फुटवे येणा-या अवस्थेवेळी तापमान सर्वसाधारणपणे 31º सें.ग्रे. असते.
   ब) अंडी उत्पादनाकरता योग्य तापमान 10-16º सें.ग्रे. असते.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 4

4) दररोज लागणा-या प्रकाशाच्या एकूण कालावधीनुसार, ..................... हे तटस्थ वनस्पतीचे उदाहरण आहे.
   1) निकोटियाना टॅबॅकम      2) ब्रासीका रॅपा
   3) सोरगम व्हलगेर      4) कॅनाबीस सटायव्हा
उत्तर :- 1

5) कोरडवाहू क्षेत्रामधील निविष्ठा पुरवणारी ‍निकृष्ठ संघटन रचना ही ................. ची कमतरता आहे.
   1) सामाजिक – आर्थिक    2) तंत्रज्ञान
   3) भौतिक साधन    4) वरीलपैकी कोणतीही नाही
उत्तर :- 1  

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...