Wednesday, 2 October 2019

500 टन प्लास्टिक कचऱयापासून होणार हायवेची निर्मिती

केंद्र सरकारने नुकताच सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उपलब्ध प्लास्टिकच्या कचऱयाची विल्हेवाट कशी लावायची यावर सरकार पर्यायी मार्गाचा विचार करत असल्याचे पहावयास मिळत आहे. उत्तर प्रदेश येथील प्लास्टिक कचऱयापासून तयार करण्यात येणाऱया रस्त्याचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

2 ऑक्टोबरपासून केंद्र सरकार देशात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करण्याची घोषणा करणार आहे. या उपक्रमात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) महत्वाची भूमिका बजावत असल्याचे पहावयास मिळत आहे. ऑक्टोबरच्या शेवटपर्यत 500 टन प्लास्टिक कचऱयाचा वापर करुन 100 किलोमीटर नवीन हायवे निर्मितीचे ध्येय निश्चित केले आहे. एनएचआय काश्मीर येथेही प्लास्टिकचा वापर करुन रस्ते तयार करण्याचे काम  सुरु आहे. यात 270 किलोमीटर जम्मू-श्रीनगर नॅशनल हायवेची निर्मिती केली जाणार आहे.

एनएचएआय देखभाल करणार

प्लास्टिक कचऱयापासून तयार होणाऱया रस्त्याची देखभाल एनएचएआय  करणार आहे. एकूण रस्त्याच्या बांधणीत सात टन प्लास्टिक कचऱयातून 1 किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात येणार आहे.

कचऱयाचे योग्य संकलन

देशात दररोज 25940 टन प्लास्टिक कचऱयाची निर्मिती होते. यातील जवळपास 10376 टन प्लास्टिक कचऱयाचे संकलन होत नाही. भारतात कचरा एकत्रित करण्याची जबाबदारी कोणा एकावर नव्हती. परंतु 2016पासून वेस्ट मॅनेजमेन्ट नियमानुसार प्लास्टिक कचऱयाचे संकलन करण्यावर भर देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...