Thursday, 3 October 2019

चालू घडामोडी प्रश्नसंच 4/10/2019

📌गुगल कंपनीने 1 ऑक्टोबर रोजी डॉ. हर्बर्ट क्लेबर यांच्या उत्कृष्ट योगदानाचा गौरव केला. डॉ. क्लेबर कशासाठी प्रसिद्ध होते?

(A) मानसशास्त्रज्ञ✅✅✅
(B) ऑन्कोलॉजिस्ट
(C) चिकित्सक
(D) कृषीशास्त्रज्ञ

📌कोणत्या विषयाखाली 2 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्र सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यटन पर्व 2019’ या कार्यक्रमाला सुरुवात झाली?

(A) पधारो म्हारे देश
(B) देखो अपना देश✅✅✅
(C) टुरिझम रिस्पोंडींग टू द चॅलेंज ऑफ क्लायमेट चेंज अँड ग्लोबल वार्मिंग
(D) वसुधैव कुटुंबकम: इंडिया अँड द वर्ल्ड

📌3 ऑक्टोबर रोजी _ येथे ‘जागतिक आर्थिक मंच’च्या ‘भारत आर्थिक शिखर परिषद’ची 33 वी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

(A) नवी दिल्ली✅✅✅
(B) मुंबई
(C) हैदराबाद
(D) बेंगळुरू

📌ओडिशाच्या चांदीपूर येथे यशस्वीपणे चाचणी घेण्यात आलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या जमिनी-आवृत्तीची मारा क्षमता ____ एवढी आहे.

(A) 290 किलोमीटर✅✅✅
(B) 450 किलोमीटर
(C) 320 किलोमीटर
(D) 270 किलोमीटर

📌तैवानमध्ये धडकलेल्या _ चक्रीवादळामुळे कमाल 162 किलोमीटर प्रतितास गतीने वारे वाहू लागले, ज्यामुळे अनेक लोक जखमी झालेत आणि हजारो घरे अंधारात गेली व शेतीचे क्षेत्र नष्ट झाले.

(A) पाबुक
(B) मिताग✅✅✅
(C) एलिस
(D) वूटीप

📌नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स' संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या,

I. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने निर्देशांक प्रसिद्ध केला आहे.

II. या यादीत केरळ आणि बिहार अनुक्रमे प्रथम व तळाशी आहेत.

III. शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात कोणत्याही केंद्रशासित प्रदेशाचे मूल्यांकन केले गेले नाही.

वरती दिलेले कोणते विधान अचूक आहे?

(A) केवळ I
(B) एकही नाही✅✅✅
(C) I आणि II
(D) II आणि III

📌____________________ याच्यावतीने देशभरात 15 दिवस चालणारा “अॅप्रेंटिसशिप पखवाडा’ नावाचा कार्यक्रम राबविण्यास सुरू करण्यात आला आहे.

(A) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
✅✅✅
(B) कामगार व रोजगार मंत्रालय
(C) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
(D) मनुष्यबळ विकास मंत्रालय

📌_____________ याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्यावतीने नवी दिल्लीत ‘आरोग्य मंथन’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

(A) आयुषमान भारत✅✅✅
(B) स्वच्छ भारत
(C) राष्ट्रीय पोषण मिशन
(D) मिशन इंद्रधनुष

📌NBCC या संस्थेनी राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठाच्या विकासासाठी क्रिडा मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे. त्यासंदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या,

I. प्रस्तावित विद्यापीठ अरुणाचल प्रदेशात उभारले जाणार आहे.

II. NBCC ही एक मिनीरत्न कंपनी आहे जी या प्रकल्पांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा प्रदान करणार आहे.

III. क्रिडाशास्त्र, क्रिडा चिकित्सा, क्रिडा व्यवस्थापन, क्रिडा प्रशिक्षण व क्रिडा तंत्रज्ञान इत्यादी विषयांमध्ये क्रिडा विषयक शिक्षण देणारे विद्यापीठ अत्याधुनिक असे पहिलेच विद्यापीठ असणार.

वर दिलेले कोणते विधान चुकीचे आहे?

(A) केवळ I
(B) केवळ I आणि II✅✅✅
(C) केवळ II
(D) एकही नाही

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...