♻️ टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
♻️ अश्विनने कसोटीत सर्वात वेगवान 350 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून अश्विनने जोरदार पुनरागमन केलं आहे. पहिल्या डावात त्याने सात विकेट्स घेत आपल्या विकेट्सची संख्या 349 वर पोहोचवली होती.
♻️ आज दुसऱ्या डावात पहिली विकेट घेत अश्विनने भारताकडून वेगवान 350 विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. 66 व्या सामन्यात त्याने 350 विकेट घेतल्या आहेत. यासह त्यानं श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा विश्वविक्रमाची बरोबरी केली.
♻️ भारताकडून अनिल कुंबळेने 77 सामन्यात 350 विकेट तर हरभजन सिंहने 83 सामन्यात 350 विकेट्स घेतल्या होत्या.
♻️ श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने 66 व्या कसोटीत 350 वा गडी बाद केला होता. कसोटीमध्ये 800 गडी बाद करणारा मुरलीधरन जगातील एकमेव गोलंदाज आहे.
♻️ कसोटीत पाच विकेट घेण्याची कामगिरी अश्विनने आतापर्यंत 27 वेळा केली आहे. याशिवाय सात वेळा 10 गडी बाद करण्याची कमालही त्यानं केली आहे.
♻️ याचबरोबर जलद 250 आणि 300 बळी घेण्याचा विश्वविक्रम देखील अश्विनच्याच नावावर आहे.
No comments:
Post a Comment