1. ‘विराजमान झालेला’ या शाब्दसमुहाबद्दल योग्य असणारा शब्द कोणता?
अतिथी
अग्रज
अधिष्ठित
विद्यमान
उत्तर : विद्यमान
2. ‘कोल्हेकुई’ या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता?
निष्फळ बडबड
निरर्थक गोष्ट
क्षुद्र लोकांची ओरड
अर्थहीन पाठांतर
उत्तर :क्षुद्र लोकांची ओरड
3. वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाची —– हे वाक्य पूर्ण करण्यात कोणता वाक्यप्रचार योग्य ठरेल?
पित्तखवळणे
कंबर खचणे
कंबर बांधणे
धकडी भरणे
उत्तर :कंबर खचणे
4. ‘सप्तपदी’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा?
व्दंव्द
उपपदतत्पुरुष
बहूव्रीही
व्दिगू
उत्तर :व्दिगू
5. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?
अत्तर
पेशवा
तंबाखू
दादर
उत्तर :तंबाखू
6. ‘आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या वाक्यातील उपमान कोणते?
माया
तुझी
आम्हावारी
आभाळागत
उत्तर :आभाळागत
7. ‘तो काम न करता नुसता फिरत असतो’. या वाक्याचा काळ ओळखा?
रिती वर्तमानकाळ
साधावर्तमानकाळ
अपूर्ण वर्तमानकाळ
रिती भूतकाळ
उत्तर :रिती वर्तमानकाळ
8. ‘जाऊ’ या शब्दाचे अनेकवचनी रुपे कोणते?
जाऊ
जाववा
ज्यावा
जावा
उत्तर :जावा
9. ‘दृष्टी आड सृष्टी’ या म्हणीचा अर्थ कोणता?
दृष्टीत दोष असणे
दृष्टीशिवाय दिसत नाही
आंधळ्याला सृष्टी दिसत नाही
आपल्या मागे काय चालले त्याकडे दुर्लक्ष करावे.
उत्तर :आपल्या मागे काय चालले त्याकडे दुर्लक्ष करावे.
10. ‘केसरी’ या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?
लाला लजपतराय
सुभाषचंद्र बोस
बाळ गंगाधर टिळक
रामनाथ गोयंका
उत्तर :बाळ गंगाधर टिळक
11. महात्मा गांधीजीचा जन्म कोठे झाला?
पोरबंदर
राजकोट
साबरमती
सेवाग्राम
उत्तर :पोरबंदर
12. महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे?
शिर्डी
त्र्यंबकेश्वर
नांदेड
पैठण
उत्तर :त्र्यंबकेश्वर
13. इंडिया गेट हे कोणत्या ठिकाणी आहे?
दिल्ली
मुंबई
आग्रा
चेन्नई
उत्तर :दिल्ली
14. गोंदिया जिल्ह्यातील गाढवी नदीवरती कोणता तलाव बांधलेला आहे?
इटीयाडोह
नवेगाव
कुर्हाडा
सिवनी
उत्तर :इटीयाडोह
15. गोंदिया जिल्हयातील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान पर्यटन स्थळ कोणत्या तालुक्यात आहे?
तिरोडा
मोरगाव अर्जुनी
सालेकसा
देवरी
उत्तर :मोरगाव अर्जुनी
16. तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात होते?
उत्तरप्रदेश
आंध्रप्रदेश
महाराष्ट्र
केरळ
उत्तर :आंध्रप्रदेश
17. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ते निवडा.
लोकसभा
राज्यसभा
विधानसभा
विधान परिषद
उत्तर :राज्यसभा
18. गोंदिया ते कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे केव्हा सुरू झाली?
25 सप्टेंबर 1996
26 सप्टेंबर 1996
25 ऑक्टोबर 1996
25 सप्टेंबर 1995
उत्तर :25 सप्टेंबर 1996
19. आयएसआय ही कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे?
बांग्लादेश
इराण
अफगाणिस्तान
पाकिस्तान
उत्तर :पाकिस्तान
20. सागरतळावर होणार्या भूकंपामुळे पाण्याला हादरे बसून पाण्यावर लाटा निर्माण होतात त्यास काय म्हणतात?
भूकंप
त्सुनामी
जलतरंग
लाटा
उत्तर :त्सुनामी
----------------------------------------
No comments:
Post a Comment