‘जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स’ यामध्ये भारत सामील झाला आहे. स्मार्ट शहरे तंत्रज्ञानाचा जबाबदारीने व नैतिक वापर करण्याच्या दिशेने कार्य करणार्या जगातल्या अग्रगण्य शहरांच्या जाळ्यातल्या 15 सदस्यांना सामील झाला आहे.
- जागतिक आर्थिक मंचाचा (WEF) ‘जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स ऑन टेक्नॉलॉजी गव्हर्नन्स’ हा समूह सार्वजनिक जागांवर जोडल्या गेलेल्या उपकरणांच्या वापरासाठी जागतिक मानदंड आणि धोरणांचे मानक तयार करणार आहे.
- स्मार्ट सिटी तंत्रज्ञान रहदारी कमी करण्यास, गुन्हेगारीशी लढा देण्यास, नैसर्गिक आपत्तींशी जुळवून घेण्यासाठी आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यास मदत करते. मात्र योग्य काळजी न घेतल्यास हे तंत्रज्ञान विशेषत: गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण धोका ठरते.
📌युतीचा इतिहास
- जून 2019 मध्ये जपानच्या ओसाका शहरात जी-20 शिखर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या युतीची स्थापना करण्यात आली. युतीमध्ये जगातल्या अग्रगण्य शहरांचे जाळे आणि तंत्रज्ञान प्रशासन संघटनांमधील 15 सदस्य आहेत. जागतिक आर्थिक मंच युतीचे सचिवालय म्हणून काम करते.
- ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्सच्या संस्थात्मक भागीदारांमध्ये सन 2019 आणि सन 2020 मध्ये जी-20 समूहाच्या राष्ट्रांचा समावेश आहे, ज्यामध्ये जापान, सौदी अरब; भारताचे स्मार्ट सिटी मिशन; सिटीज फॉर ऑल; सिटीज टुडे इंस्टीट्यूट; कॉमनवेल्थ लोकल गव्हर्नमेंट फोरम; कॉमनवेल्थ सस्टेनेबल सिटीज नेटवर्क; कनेक्टेड प्लेसेस कॅटापूल्ट; डिजिटल फ्यूचर सोसायटी; ICLEI – लोकल गव्हर्नमेंट फॉर सस्टेनेबिलिटी; इंटरनॅशनल टेलीकम्यूनीकेशन यूनियन; ओपन अँड एगाईल स्मार्ट सिटीज; स्मार्ट सिटी एक्सपो वर्ल्ड कॉंग्रेस; यूनायटेड सिटीज अँड लोकल गव्हर्नमेंट; व्हॉट वर्क्स सिटीज; वर्ल्ड इकनॉमिक फोरम; आणि वर्ल्ड एनेबल यांचा समावेश आहे.
- भागीदार 2 लक्षाहून अधिक शहरे आणि स्थानिक सरकार, आघाडीच्या कंपन्या, स्टार्टअप उद्योग, संशोधन संस्था आणि नागरी संस्था यांचे प्रतिनिधित्व करतात.
No comments:
Post a Comment