Tuesday, 22 October 2019

भारत 2022 साली इंटरपोल महासभेचे आयोजन करणार

♻️ सन 2022 मध्ये ‘इंटरपोल’ या संस्थेच्या 91व्या महासभेचा आयोजक म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे. भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

♻️ भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक ऋषी कुमार शुक्ला यांनी भारताकडून याबाबत प्रस्ताव मांडला होता आणि प्रचंड बहुमताने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

♻️ इंटरपोल बाबत :

♻️ आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (INTERPOL) ही एक आंतरराष्ट्रीय पोलीस सहयोग संघटना आहे.

♻️ जगभरात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्याचे कार्य इंटरपोल करते.

♻️ इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्सच्या ल्योन या शहरात असून इतर 187 कार्यालये जगभरात आहेत.

♻️ इंटरपोल ही 194 सदस्य-देश असलेली आंतरराष्ट्रीय संस्था असून पोलीस क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याचा संस्थेला 100 वर्षांचा अनुभव आहे.

♻️ ही संघटना प्रामुख्याने सुरक्षा, दहशतवाद, संगठीत गुन्हेगारी, मानवता-विरोधी गुन्हे, पर्यावरण-विषयक गुन्हे, युद्ध-विषयक गुन्हे, शस्त्रास्त्र तस्करी, मानव तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, संगणक-विषयक गुन्हे यावर काम करते

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...