📖 सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन 1856 पर्यंत जवळ-जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती.
सन 1857 मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा राष्ट्रीय उठाव म्हणून प्रसिध्द आहे. 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दांत देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग असल्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसला. यामागे असणारी कारणे जाणून घेऊयात...
📍 *राजकीय कारणे* :
▪ इ.स.1600 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया स्थापना झाली.
▪ इ.स.1757 च्या प्लासीच्या लढाईने ब्रिटीश सत्तेचा पाया भारतात रचला गेला.
▪ इ.स.1798 मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.
▪ तैनाती फौजेच्या पद्धतीचा अवलंब करुन साम्राज्य विस्तारावर भर दिला.
▪ वेलस्लीने निजाम मराठ्यांचे शिंदे, होळकर, भोसले इ. सरदार अयोध्येचा नवाब पेशवा दुसरा आविला व अनेक संस्थाने बरखास्त केली.
▪ लॉर्ड क्लाईव्ह, लॉर्ड वॉरन हेस्टिंग, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलनी देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले.
📍 *आर्थिक कारणे* :
▪ ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यावादावर भर दिला होता.
▪ 18 व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली.
▪ शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता. शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या 2/3 हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता.
📍 *लष्करी कारणे* :
▪ शिपाई बंडास तयार होत नाही, तोपर्यंत उठाव घडून येणे शक्य नव्हते. पण राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक कारणामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला.
▪ शिपायांनी हाती बंदूक घेतली आणि उठावास सुरुवात झाली.
▪ ब्रिटिशांनी अनेक लष्करी कायदे मंजूर करुन हिंदी शिपायांवर निर्बंध लादले.
▪ इ.स.1806 मध्ये कायदा पास करुन हिंदी शिपायांवर गंध लावण्याची व दाढी करण्याची सक्ती केली.
📍 *धार्मिक कारणे* :
▪ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने धार्मिक साम्राज्यवादाचा पुरस्कार केला.
▪ इ.स.1813 च्या चार्टर अॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली.
▪ अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले.
▪ कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतला
No comments:
Post a Comment