Wednesday, 16 October 2019

भूगोल प्रश्नसंच 16/10/2019

1) ‘जेटस्ट्रीम’ चे गुणधर्म खाली दिलेले आहेत. त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा :
   अ) हे दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वा-यांच्या दरम्यान आढळतात.
   ब) हे विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवांजवळील भागात आढळतात.
   क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.
   ड) यांचा भूपृष्ठावरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.
   1) अ आणि ब    2) ब आणि क    3) अ आणि क    4) ब आणि ड
उत्तर :- 1

2) एल् निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किना-यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ?
   1) ॲटलांटिक    2) पॅसिफिक    3) इंडियन    4) आर्कटिक
उत्तर :- 2

3) भारतीय हवामान खात्याने मान्सून वा-याचे आगमन व निर्गमन यांचा अभ्यास करून चार ऋतू मानलेले आहेत, या ऋतूच्या
     सोबत कालावधी दिला आहे, यापैकी अचूक पर्याय ‍निवडा.
   अ) नैऋत्य मान्सून काळ  -  जून ते ऑक्टोबर     ब) मान्सून उत्तर काळ  -  ऑक्टोबर ते डिसेंबर
   क) ईशान्य मान्सून काळ  -  जानेवारी ते फेब्रुवारी   ड) मान्सून पूर्व काळ  -  मार्च ते मे
   1) फक्त अ विधान बरोबर आहे.      2) ब आणि क विधाने बरोबर आहेत.
   3) अ, ब आणि क विधाने बरोबर आहेत.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
उत्तर :- 4

4) भारतीय हवामान वर्गीकरणामध्ये कोपेन या शास्त्राने ‘Amw’ हे अद्यक्षर कशासाठी वापरले आहे ?
   1) निमशुष्क स्टेपी हवामान    2) मोसमी हवामान अल्पकालीन शुष्क हिवाळी
   3) मान्सून शुष्क हिवाळी      4) ध्रुवीय शुष्क हिवाळी
उत्तर :- 2

5) खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते ?
   1) हवेचा दाब    2) तापमान    3) वा-याची दिशा    4) सूर्यप्रकाश
उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...