Monday, 21 February 2022

महत्त्वाचे विज्ञान प्रश्नसंच

1) केल्वीन तापमापी किती समान भागात विभागलेली असते.
   1) 100    2) 180      3) 72      4) यापैकी नाही
उत्तर :- 1

2) अ) आम्लवर्षा निर्माण होण्यासाठी वाहन कारणीभूत आहेत.
    ब) आम्लवर्षाचा सामू 5 पेक्षा नेहमी जास्त असतो.
    क) हॉवर्ड विद्यापीठात आम्लवर्षाचा सूचक पुतळा आहे.
   1) अ योग्य, ब व क अयोग्य    2) अ व ब योग्य, क अयोग्य
   3) अ, ब, क सर्व अयोग्य      4) अ, क योग्य, ब अयोग्य
उत्तर :- 4

3) खालील कोणते जीव संघ सिलेंटेराटामधले असून वसाहतीने राहणारे आहेत.
   1) हायड्रा    2) जेलीफिश   
   3) दोन्ही    4) दोन्ही नाही
उत्तर :- 3

4) खालीलपैकी कोणते उष्णतेचे एकक आहे ?
   1) केल्वीन    2) रँकीन     
   3) डेसिबल    4) वरील सर्व
उत्तर :- 4

5) केक निर्माण करत असताना त्यामध्ये सोडिअम बायकार्बोनेट व ..................... या आम्लाचा समावेश करतात.
   1) हायड्रोक्लोरीक  2) ॲसेटीक   
  3) नायट्रीक    4) सायट्रीक
उत्तर :- 2

1) ज्या तापमानाला ........................ पदार्थाचे रूपांतर द्रव अवस्थेत होते. त्या तापमानाला पदार्थाचा द्रवणांक असे म्हणतात.
   1) स्थायू    2) वायू      3) प्लाझमा    4) बाष्प
उत्तर :- 1

2) केक व पाव हलके बनविण्यासाठी किंवा सच्छिद्र बनविण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो.
   1) सोडिअम कार्बोनेट    2) सोडिअम बायकार्बोनेट
   3) सोडिअम सल्फेट    4) सोडिअम बाय सल्फेट
उत्तर :- 2

3) खालील कोणते विधान हे निमॅटोडा संघाबाबत खरे आहे.
   अ) या प्राण्यांचे शरीर व्दिस्तीय, व्दिपार्श्वसममित असते.
   ब) या संघातील बहुसंख्य प्राणी अंत:परजीवी असून एकलिंगी असतात.
   क) यांच्या शरीरात आभासी देहगुहा असतात.
   1) अ      2) अ, ब      3) ब, क      4) अ, ब, क
उत्तर :- 3

4) एखाद्या स्थिर तापमानाला पदार्थ द्रव्य अवस्थेतून वायू अवस्थेत रूपांतरीत होतो, या क्रियेला ...................... असे म्हणतात.
   1) संप्लवन    2) संघनन    3) बाष्पीभवन    4) यापैकी नाही
उत्तर :- 3

5) अ) शास्त्रज्ञ रेनकीट बेनकिशर यांनी डेटॉल तयार केले.
    ब) डेटॉल हे पाण्यात अद्रावणीय असते.
    क) डेटॉलचे सामान्य सूत्र C8H9CIO असे आहे.
   1) अ योग्य, ब व क अयोग्य    2) अ, ब योग्य, क अयोग्य
   3) अ, ब, क  सर्व योग्य      4) अ, ब, क सर्व अयोग्य
उत्तर :- 3

1) अ) बाष्पीभवनाचा वेग द्रव्याच्या पृष्ठभागाशी समानुपपाती असतो.
    ब) बाष्पीभवनाचा वेग द्रव्याच्या तापमानाशी व्यस्तानुपाती असतो.
    क) बाष्पीभवनाचा वेग द्रव्याच्या स्वरूपावर अवलंबून असतो.
          वरील विधानांपैकी असत्य विधान कोणते ?
   1) फक्त अ    2) फक्त अ, क    3) फक्त ब    4) यापैकी नाही
उत्तर :- 3

2) डेटॉलमध्ये सर्वात जास्त प्रमाणात ............................ हे असते.
   1) आयसोप्रिन    2) क्लोरोझायलेनॉल  3) आयसोब्युटेन    4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2

3) खालील विधानांचा विचार करा.
   अ) संघ ॲनिलीडातील प्राणी त्रिस्तरीय, लांबट, दंडाकृती असते.
   ब) यांच्या शरीरात देहगुहा व साधी इंद्रिय संस्था नसते.
   क) लैंगिक प्रजनन करतात पण सहसा उभयलिंगी असतात.
   ड) या संघातील लीच हा प्राणी परजीवी आहे.
   1) अ, ब, क सत्य  2) सर्व सत्य    3) अ, क, ड  सत्य    4) अ, ब, ड सत्य
उत्तर :- 3

4) एखाद्या स्थायू पदार्थाला उष्णता दिली असता त्याचे द्रव्य अवस्थेत रूपांतर न होता सरळ वायू अवस्थेत रूपांतर होण्याच्या 
     क्रियेला ........................... असे म्हणतात.
   1) संप्लवन    2) संघनन    3) बाष्पीभवन    4) गोठण
उत्तर :- 1

5) खाली काही पदार्थ व त्यात असणा-या आम्लाच्या जोडया दिल्या आहेत. त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा.
   अ) टोमॅटो – ऑक्सलिक आम्ल    ब) दही – लॅक्टीक आम्ल
   क) लिंबू – सायट्रीक आम्ल    ड) मधमाशीचा चावा – फॉरमीक आम्ल
   इ) वॅलेरम वनस्पती - ॲसेटीक ॲसिड
   1) फक्त ड    2) फक्त ब व ड    3) फक्त इ    4) फक्त ड व इ
उत्तर :- 4

1) .................... अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे खोडांच्या आणि मुळांच्या टोकांवर दिसून येतात.
   1) नत्र आणि गंधक    2) बोरॉन आणि चुना   
  3) मॅग्नेशियम आणि लोह    4) पालाश आणि स्फुरद
उत्तर :- 2

2) किसान क्रेडिट कार्ड योजना संपूर्ण देशात लागू झाली असून या योजनेखाली शेतीविषयक कामांकरिता कर्ज दिले जाते. या
     योजनेबाबत काय खरे नाही ?
   अ) ही योजना केवळ सहकारी बँक व क्षेत्रीय ग्रामीण बँकांव्दारे अंमलात आणली जाते.
   ब) या योजनेंतर्गत केवळ शेती करण्यावस्तव लागणा-या बाबींच्या वापरासाठी कर्ज दिले जाते परंतु मुदतीचे कर्ज दिले जात नाही.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 3

3) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे.
   अ) भात पिकास फुटवे येणा-या अवस्थेवेळी तापमान सर्वसाधारणपणे 31º सें.ग्रे. असते.
   ब) अंडी उत्पादनाकरता योग्य तापमान 10-16º सें.ग्रे. असते.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 4

4) दररोज लागणा-या प्रकाशाच्या एकूण कालावधीनुसार, ..................... हे तटस्थ वनस्पतीचे उदाहरण आहे.
   1) निकोटियाना टॅबॅकम      2) ब्रासीका रॅपा
   3) सोरगम व्हलगेर      4) कॅनाबीस सटायव्हा
उत्तर :- 1

5) कोरडवाहू क्षेत्रामधील निविष्ठा पुरवणारी ‍निकृष्ठ संघटन रचना ही ................. ची कमतरता आहे.
   1) सामाजिक – आर्थिक    2) तंत्रज्ञान
   3) भौतिक साधन    4) वरीलपैकी कोणतीही नाही
उत्तर :- 1

1) भारतातील पहिले कृत्रिम बुध्दिमत्ता संशोधन केंद्र कोठे उभारण्यात आले ?
   अ) दिल्ली    ब) मुंबई      क) नागपूर    ड) यापैकी नाही
  1) क      2) ब      3) ड      4) अ
उत्तर :- 2

2) बिनचूक जोडया निवडा. (रेल्वे विभाग – मुख्यालय)
   अ) उत्तर-पूर्व सीमा रेल्वे  --  मालीगाव गुवाहाटी
   ब) पश्चिम रेल्वे      --  मुंबई (चर्चगेट)
   क) दक्षिण रेल्वे    --  चैन्नई
   ड) दक्षिण-मध्य रेल्वे    --  सिकंदराबाद
  1) अ, ब, क    2) अ, क, ड    3) अ, ब, ड    4) अ, ब, क, ड
उत्तर :- 4

3) स्वेच्छा मरणाचा हक्क प्रदान करणारा जगातील पहिला देश कोणता.
   1) न्यूझीलँड    2) नेदरलँड    3) थायलँड    4) यापैकी नाही
उत्तर :- 2

4) रोबोटला नागरिकत्व प्रदान करणारा जगातील पहिला देश कोणता.
   1) अमेरिका     2) सौदी अरेबिया  3) फ्रान्स    4) जपान
उत्तर :- 2

5) बिनचूक जोडया निवडा. (राज्य – स्थापना)
   अ) छत्तीसगड    --  1 नोव्हेंबर 2000
   ब) उत्तराखंड    --  9 नोव्हेंबर 2000
   क) झारखंड    --  15 नोव्हेंबर 2000
   ड) तेलंगाणा    --  2 जून 2014
  1) अ, ब, क    2) अ, ब, क, ड    3) अ, क, ड    4) अ, ब, ड
उत्तर :- 2

1) एखाद्या पदार्थाचे वायुरूप अवस्थेतून द्रव्यरूप अवस्थेत रूपांतर होण्याच्या क्रियेला ......................... असे म्हणतात.
   1) संघनन    2) गोठण      3) संप्लवन    4) बाष्पीभवन
उत्तर :- 1

2) कोलगेटमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात .......................... या घटकाचे समावेश असतो.
   1) सिलीका    2) ग्लिसरीन    3) सॉरबीटॉल    4) सोडिअम फ्युराइड
उत्तर :- 4

3) खालीलपैकी योग्य जोडया लावा.
  पृष्ठवंशीय प्राणी      हृदयाच्या कप्प्यांची संख्या
         अ) मत्स्य          2
         ब) उभयचर          3
         क) सरीसृप          3
         ड) पक्षी          4
         इ) सस्तन प्राणी        4
   1) अ, ड, इ    2) अ, क, ड, इ    3) अ, ब, ड, इ    4) वरील सर्व
उत्तर :- 4

4) खालीलपैकी उष्णतेचा वाहक उत्तम सुवाहक कोणता पदार्थ आहे.
   1) पारा    2) पाणी      3) चामडे      4) बेंझीन
उत्तर :- 1

5) हरभ-याच्या कोवळया पानामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश होतो.
   1) मायनोसिस आम्ल    2) मॅलीक आम्ल
   3) मिथेनॉइक आम्ल    4) ॲसेटीक आम्ल
उत्तर :- 2

1) भौतिकशास्त्राच्या ज्या शाखेत उष्णता ऊर्जेच्या एका स्वरूपातून दुस-या स्वरूपात होणा-या रूपांतरणाचा अभ्यास केला जातो,
     त्या शाखेला ........................... असे म्हणतात.
   1) उष्माभौतिकी      2) उष्मागतिकी   
   3) उष्मारासायनिक    4) उष्माऊर्जाशास्त्र
उत्तर :- 2

2) लोणचे व मुरंबा टिकवून ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणते आम्ल वापरात येते ?
   1) सायट्रीक आम्ल    2) बेन्झाइक आम्ल   
   3) नायट्रीक आम्ल    4) वरील सर्व
उत्तर :- 2

3) खालीलपैकी कोणत्या वनस्पतींचे अलैंगिक प्रजनन बिजाणूनिर्मितीव्दारे, तर लैंगिक प्रजनन युग्मकनिर्मितीव्दारे होते.
   अ) डिमन्टम    ब) लायकोपोडियम    क) मार्सेलिया    ड) सिलॅजिनेला
   1) वरील सर्व    2) यापैकी नाही    3) अ, ड      4) ब, ड
उत्तर :- 1

4) रात्री जोराचे वारे वाहत असतील तर दवबिंदू तयार होत नाहीत कारण ...........................
   1) बाष्पीभवनाचा दर अधिक असतो.    2) हवेत आर्द्रतेचा अभाव असतो.
   3) हवेचे तापमान अधिक असते.      4) आकाश निरभ्र नसते.
उत्तर :- 1

5) आयनिक बंध म्हणजे .............................
   1) इलेक्ट्रॉनच्या भागीदारीतून निर्माण होतो.    2) इलेक्ट्रॉनच्या देवाण – घेवाणीतून निर्माण होतो.
   3) इलेक्ट्रॉन गमावल्याने तयार होतो.    4) वरीलपैकी नाही.
उत्तर :- 2

1) क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कशासाठी होतो.
   1) अंतराळ प्रवास, शल्यचिकित्सा, चुंबकीय अनुवाद    2) शल्यचिकित्सा, चुंबकीय अनुवाद, सुदूर संवेदन
   3) अंतराळ प्रवास, शल्यचिकित्सा, सुदूर संवेदन    4) अंतराळ प्रवास, चुंबकीय अनुवाद, सुदूर संवेदन
उत्तर :- 3

2) सापाचे विष हे ...........................
   1) आम्लयुक्त असते      2) आम्लारीयुक्त असते   
   3) आम्ल व आम्लारी दोन्ही असते    4) उदासीन असते
उत्तर :- 1

3) खालीलपैकी कोणते जीव संघ सिलेंटेराटामधले असून वसाहतीने राहणारे आहेत.
   1) कोरल्स    2) सी – निमोज   
   3) दोन्ही नाही    4) दोन्ही
उत्तर :- 4

4) केल्वीन मापन पध्दत सर्वसामान्य मानवी शरीराचे तापमान किती दर्शविते ?
   1) 2800K    2) 290K     
   3) 300K    4) 310K
उत्तर :- 4

5) काही बंध हे इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने निर्माण होत असतात अशा बंधाला ..........................
   1) सहसंयुज बंध    2) विद्युत संयुज बंध 
   3) आयनिक बंध    4) मेटॅलिक बंध
उत्तर :- 1

1) एखाद्या पदार्थाचे तापमान किती डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होऊ शकते ?
   1) -273ºc    2) 0ºc      3) -300ºc    4) -1000ºc
उत्तर :- 1

2) एखाद्या बंधनात धनप्रभारीत व ऋणप्रभारीत कणाचे आकर्षण निर्माण होते अशा बंधास .................. असे म्हणतात.
   1) सहसंयुज बंध    2) विद्युत संयुज बंध  3) वरील दोन्ही    4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2

3) योग्य जोडया लावा.
   अ) गोल कृमी      1) ॲस्कॅरिसीस
   ब) पीनवर्म      2) उलटया
   क) फायलेरिया      3) हत्तीपाय
   ड) हुकवर्म      4) पोटदुखी
  अ  ब  क  ड
         1)  2  3  1  4
         2)  4  2  3  1
         3)  1  2  3  4
         4)  4  3  2  1
उत्तर :- 3

4) कॅरनॉट इंजिन खालीलपैकी कोणत्या स्थितीत उष्णतेचे ग्रहण करते.
   1) स्थिर तापमानाला    2) स्थिर घनतेला    3) स्थिर दाबाला    4) वरील पैकी नाही
उत्तर :- 1

5) अ) एक इलेक्ट्रॉनच्या जोडीने एकेरी बंध निर्माण होतो.
    ब) दोन इलेक्ट्रॉनच्या जोडीने दुहेरी बंध निर्माण होतो.
    क) तीन इलेक्ट्रॉनच्या जोडीने तिहेरी बंध तयार होतो.
         वरील विधानांचा विचार करून अयोग्य विधान ओळखा.
   1) फक्त अ    2) फक्त ब    3) अ व ब दोन्ही योग्य    4) अ, ब, क एकही  नाही
उत्तर :- 4

1) मासे गोठलेल्या जलाशयात जिवंत राहू शकतात कारण –
   1) मासे उष्णरक्ताचे प्राणी असतात.      2) मासे बर्फाला निष्क्रीय करतात.
   3) जलाशयाच्या तळाला पाणी गोठत नाही.     4) बर्फ हा उष्णतेचा सुवाहक असतो.
उत्तर :- 3

2) दुहेरी सहसंयुज बंध ......................
   1) दोन इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने तयार होतात.  2) दोन इलेक्ट्रॉनच्या जोडीच्या भागीदारीने तयार होतो.
   3) तीन इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने तयार होतो.  4) वरीलपैकी एकही कारण नाही.
उत्तर :- 2

3) खालीलपैकी कोणते संप्रेरके मेदारूपात असून जननेंद्रियांशी संबंधित आहेत.
   1) इस्ट्रोजन    2) प्रोजेस्टेरॉन    3) टेस्टोटेरॉन    4) वरील  सर्व
उत्तर :- 4

4) जर 106K च्या प्रमाणात तापमान मोजायचे असेल तर कशाने मोजणार .................
   1) थर्मामीटर    2) पायरोमीटर    3) थर्मोकपल    4) यापैकी नाही
उत्तर :- 2

5) आयनिक संयुगे ......................
   अ) हे संयुग धातू व अधातू मूलद्रव्यात तयार होते.
   ब) यांचा द्रवणांक जास्त असतो.
   क) हे पाण्यात विरघळत नाही.
   1) फक्त अ विधान सत्य      2) फक्त ब विधान सत्य
   3) फक्त अ व ब विधान सत्य    4) फक्त ब व क विधान सत्य
उत्तर :- 3

1 comment:

  1. Borgata Hotel Casino & Spa - BSNJ
    The Borgata Hotel Casino & Spa has multiple 카지노 가입 쿠폰 즉시 지급 amenities that are sure to 페이 백 먹튀 please most. Book your suite now! The Borgata Hotel Casino & 해외 카지노 사이트 Spa has 카지노코인 over 7,000 바인드 토토

    ReplyDelete

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...