Saturday, 12 October 2019

भूगोल प्रश्नसंच 12/10/2019

1) भूपृष्ठावरील काही पदार्थ, साधारणत: खडक आणि खनिज पदार्थ ................. मुळे प्रतिदिप्तीत होतात किंवा सदृश्य प्रकाशमान
     होतात.
   1) अवरक्त प्रारण    2) औष्णिक प्रारण   
   3) सूक्ष्मतरंग प्रारण    4) जंबुपार प्रारण
उत्तर :- 4

2) मध्य कटिबंधातील आवर्ताचा व्यास :
   1) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासाइतका असतो.
   2) कधी उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षाही कमी तर कधी जास्त असतो.
   3) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षा जास्त असतो.
   4) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षा कमी असतो.
उत्तर :- 3

3) विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव
   1) दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक    2) गडगडाटासह जोरदार पाऊस
   3) वेगवान वारे          4) थंड रात्री
उत्तर :- 2

4) रॉकीजमधील अतिशुष्क व उष्ण वारा म्हणजे :
   1) फॉन    2) लू      3) चिनूक      4) मिस्ट्रल
उत्तर :- 3

5) खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ?
   1) जून      2) सप्टेंबर    3) डिसेंबर    4) मार्च
उत्तर :- 1

No comments:

Post a Comment