1) ‘सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी’ – अलंकार ओळखा.
1) उत्प्रेक्षा 2) उपमा 3) रूपक 4) यमक
उत्तर :- 2
2) खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ?
1) पेशवा 2) पाव 3) पावडर 4) पाकीट
उत्तर :- 2
3) रस व त्याचे स्थायीभाव यांच्या जोडया लावा.
अ) शांत i) जुगुप्सा
ब) अद्भुत ii) उत्साह
क) वीर iii) शम
ड) बीभत्स iv) विस्मय
अ ब क ड
1) i iii iv ii
2) iii iv ii i
3) i ii iii iv
4) iv i ii iii
उत्तर :- 2
4) वेगळा शब्द ओळखा.
1) ग्रंथ 2) पोथी 3) पुस्तक 4) पिशवी
उत्तर :- 4
5) ‘मोहन नीताला तिच्या परीक्ष बोलला होता’ या वाक्यातील ‘परीक्ष’ शब्दाच्या विरुध्द असणारा शब्द निवडा.
1) उपकार 2) अपरोक्ष 3) परिधान 4) उपेक्षित
उत्तर :- 2
6) घटना प्रसंगासाठी साजेशी म्हण शोधा.
‘एखादी गोष्ट खूप वेळा चर्चिली गेली की तिचे महत्त्व कमी होते.’
1) फार झाले हसू आले 2) नव्याचे नऊ दिवस
3) नवी विटी नवे राज्य 4) नाव मोठे लक्षण खोटे
उत्तर :- 1
7) ‘खांदेपालट करणे’ हा वाक्यप्रयोग पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
1) अन्त्ययात्रा 2) डाव 3) घटका 4) दंड
उत्तर :- 1
8) ‘सहा महिन्यांतून एकदा प्रसिध्द होणारे’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता शब्द आहे ते ओळखा.
1) मासिक 2) दैनिक 3) सामासिक 4) षण्मासिक
उत्तर :- 4
9) पुढील पर्यायांपैकी कोणता शब्द शुध्द लेखनाच्या दृष्टीने योग्य आहे ते ओळखा.
1) षष्ठयब्दिपूर्ती 2) षष्टयब्दिपूर्ति 3) षष्टयब्दीपूर्ती 4) षष्टयब्दिपुर्ति
उत्तर :- 1
10) मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा.
1) त्, थ्, द्, ध्, न् 2) ट्, ठ्, ड्, ढ्, ण्
3) प्, फ्, ब्, भ्, म् 4) च्, छ्, ज्, झ्, म्
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment