Tuesday, 29 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘सुरेखा चित्र काढत असे’ – काळ ओळखा.

   1) साधा भूतकाळ    2) रीती भूतकाळ    3) अपूर्ण भूतकाळ    4) पूर्ण भूतकाळ

उत्तर :- 2

2) ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

   1) भ्रतार      2) सुतारीण    3) लोहार    4) होलार

उत्तर :- 2

3) सोने – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

   1) सोन्य      2) सोनं      3) सोने      4) सोनी

उत्तर :- 3

4) पुढील विधाने वाचा.

   अ) ईकारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप याकारान्त होते.
   ब) ऊ – कारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप वाकारान्त होते.
   क) ओकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ओकारान्तच राहते.

   1) अ व ब बरोबर    2) ब व क बरोबर    3) अ बरोबर    4) सर्व बरोबर

उत्तर :- 4

5) कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात ?

   1) षष्ठी        2) संबोधन    3) प्रथमा      4) तृतीया

उत्तर :- 3   

6) ‘तु फार चतुर आहेस’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

   1) आज्ञार्थी    2) उद्गारार्थी    3) विधानार्थी    4) प्रश्नार्थी

उत्तर :- 3

7) ‘विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला.’ या वाक्यातील ‘अंत’ या शब्दाला वाक्य पृथक्करणात .............. म्हणतात.

   1) उद्देश्य    2) उद्देश्य विस्तार    3) क्रियापद    4) विधानपूरक

उत्तर :- 1

8) रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा : भावे प्रयोगात क्रियापद नेहमी ............. असते.

   1) नपुंसकलिंगी    2) पुल्लिंगी    3) स्त्रीलिंगी    4) अनेकलिंगी

उत्तर :- 1

9) अव्ययीभाव समासात

   1) पहिले पद महत्त्वाचे असते    2) दुसरे पद महत्त्वाचे असते
   3) दोन्ही पदे महत्त्वाची असतात    4) दोन्ही पदांनी सूचित केलेले वेगळेच पद महत्त्वाचे असते

उत्तर :- 1

10) वाक्‍यातून जिज्ञासा, कुतूहल, जाणून घेणे असा अर्थ विचारला जात असेल तर .............. हे विरामचिन्ह वापरतात.

   1) पूर्णविराम    2) प्रश्नचिन्ह    3) उद्गारचिन्ह    4) विचारचिन्हविराम

उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...