1) पुढील वाक्यातील रिकामी जागा अचूक पर्यायाने भरा.
शब्दाच्या अक्षरांमधील शेवटच्या अक्षराला .............. म्हणतात.
1) अन्त्य अक्षर 2) आद्य अक्षर 3) उपान्त्य अक्षर 4) उपान्त्यर्पू अक्षर
उत्तर :- 1
2) ‘वाडमय’ या शब्दातील संधी सोडवा.
1) वाग् + मय 2) वाक् + अमय 3) वाक् + मय 4) वांग + मय
उत्तर :- 3
3) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
“नुसती हुशारी काय कामाची ?”
1) विशेषण 2) गुणधर्मदर्शक भाववाचक नाम
3) सामान्य नाम 4) विशेषनाम
उत्तर :- 2
4) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
‘कुठे आहे तो भामटा ? तो बघा पळाला’
1) दर्शक सर्वनाम 2) संबंध सर्वनाम 3) आत्मवाचक सर्वनाम 4) सामान्य सर्वनाम
उत्तर :- 1
5) पुढील शब्दापासून विशेषण कशाप्रकारे तयार होईल ते चार पर्यायातून निवडा. – नागपूर .............
1) नागपूरकर 2) संत्री 3) नागपूरी 4) मोसंबी
उत्तर :- 3
6) ‘मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला’ – या वाक्यातील कर्ता ओळखा.
1) मी 2) संकष्टी चतुर्थी 3) चंद्र 4) दिसणे
उत्तर :- 3
7) खालील अधोरेखित शब्दाला क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘पाणी गटागट पिऊ नकोस’
1) परिणाम दर्शक क्रियाविशेषण अव्यय 2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
3) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय 4) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
उत्तर :- 4
8) शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्तीप्रत्ययेही स्वतंत्रपणे येऊ शकतात. उत्तरांचा योग्य पर्याय सांगा.
1) हे संपूर्ण विधान चूक आहे 2) विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे
3) विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे 4) हे संपूर्ण विधान बरोबर आहे
उत्तर :- 2
9) अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – ‘आम्ही जाऊ नाहीतर राहू, तुला काय त्याचे ?’
1) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय 2) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
3) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय 4) उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय
उत्तर :- 3
10) उंहू ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो.
1) विरोध 2) तिरस्कार 3) शोक 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
No comments:
Post a Comment