1) ‘चंद्रोदय’ या जोडशब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा.
1) आ + उ = ओ 2) द्र + ओ = द्रो
3) अ + उ = ओ 4) र + ओ = रो
उत्तर :- 3
2) नामाच्या उपप्रकारांपैकी फक्त ......................... अनेकवचन होते.
1) विशेषनामाचेच 2) धर्मवाचक नामाचेच
3) भाववाचक नामाचेच 4) सामान्य नामाचेच
उत्तर :- 4
3) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. – हा माझा वर्गबंधू आहे.
1) दर्शक सर्वनाम 2) संबंधी सर्वनाम
3) आत्मवाचक सर्वनाम 4) पुरुषवाचक सर्वनाम
उत्तर :- 1
4) ‘कडक ऊन पडले आहे’ अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.
1) धातुसाधित 2) संख्यावाचक
3) गुणवाचक 4) सार्वनामिक
उत्तर :- 3
5) ‘मला दोन मैल चालवते.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?
1) प्रयोजक क्रियापद 2) संयुक्त क्रियापद
3) शक्य क्रियापद 4) अनियमित क्रियापद
उत्तर :- 3
6) पुढील वाक्यातील वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा.
1) सूर्य पूर्वेस उगवतो 2) तुम्ही पुढे व्हा, मी येतो
3) मी बसलो तोच तुम्ही हजर 4) गुरुजी आत शाळेत असतील
उत्तर :- 1
7) ‘साखरभात’ या शब्दाचे लिंग कोणते ?
1) पुल्लिंगी 2) स्त्रीलिंग 3) नपुंसकलिंग 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
8) योग्य जोडया लावा.
विभक्ती कारक
अ) प्रथमा 1) तुला
ब) व्दितीया 2) तू
क) तृतीया 3) तुजहून
ड) पंचमी 4) तुजशी
अ ब क ड
1) 2 1 4 3
2) 2 1 3 4
3) 2 3 1 4
4) 1 2 3 4
उत्तर :- 1
9) ‘तू माझे ऐकलेस हे बरे झाले’ – वाक्याचा प्रकार ओळखा.
1) प्रधान वाक्य 2) गौण वाक्य 3) मिश्र वाक्य 4) संयुक्त वाक्य
उत्तर :- 3
10) ‘मग त्यावर आकाशातल्या पणत्या तेवत असतात.’ – वरील वाक्यातील विधेय विस्तार सांगा.
1) आकाशातल्या 2) पणत्या 3) मग त्यावर 4) तेवत असतात
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment