Sunday, 20 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 सराव प्रश्न

1) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरता?

   1) पूर्णविराम    2) अर्धविराम    3) स्वल्पविराम    4) अपूर्ण विराम

उत्तर :- 3

2) ‘सरडयाची धाव कुंपणापर्यंत’ – या वाक्यातील अलंकार ओळखा.

   1) अन्योक्ती    2) चेतनगुणोक्ती    3) स्वभावोक्ती    4) अतिशयोक्ती

उत्तर :- 1

3) ‘धातुसाधित’ यास दुसरे नाव कोणते ?

   1) शुध्द शब्दयोगी  2) शब्द सिध्दी    3) उभयविध धातू    4) कृदंत

उत्तर :- 4

4) घडयाळाने पाच वाजल्याचे दर्शविले’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

   1) अभिधा     2) लक्षणा    3) लाक्षणिक    4) व्यंजना

उत्तर :- 4

5) ‘गाय’ शब्दाशी संबंधित नसलेला शब्द ओळखा :

   1) धेनू      2) गोमाता    3) गो      4) Go

उत्तर :- 4

6) ‘वाघ्या’ या शब्दाच्या विरुध्दलिंगी शब्द ओळखा.

   1) वाघीण    2) वाघी      3) मुरळी      4) मुरळीण

उत्तर :- 3

7) “खाई त्याला खवखवे” या म्हणीशी अर्थाच्या दृष्टीने जास्तीत जास्त जुळणारी म्हण निवडा.

   1) चोराच्या मनात चांदणे      2) उथळ पाण्याला खळखळाट फार
   3) नाचता येईना अंगण वाकडे    4) करावे तसे भरावे

उत्तर :- 1

8) ‘दुर्लक्ष करणे’ या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता ?

   1) कान टोचणे      2) कानाडोळा करणे
   3) कानात तेल घालून झोपणे  4) कानाला खडा लावणे

उत्तर :- 2

9) ‘ज्याला आई, वडिल नाहीत असा असलेला’ या शब्दसमुहासाठी योग्य पर्याय निवडा.

   1) सनाथ    2) दुबळा      3) पोरका    4) वनवासी

उत्तर :- 3

10) व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता, ते लिहा.

   1) दु:दैवी    2) दुदैवी      3) दुर्दैवी      4) दुर्वेवी

उत्तर :- 3

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...