1) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’ हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे ?
1) उपमा 2) उत्प्रेक्षा 3) रूपक 4) अपन्हुती
उत्तर :- 2
2) अभ्यस्त शब्द ओळखा.
1) तुरट 2) आंबट चिंबट 3) खारट 4) कडवट
उत्तर :- 2
3) स्वातंत्र्य युध्दाच्याकाळात देशभक्तांनी भोगलेल्या तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील
अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ?
1) लक्ष्यार्थ 2) वाच्यार्थ 3) वाक्यार्थ 4) शब्दार्थ
उत्तर :- 1
4) पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखा.
1) दैत्य 2) दानव 3) राक्षस 4) देव
उत्तर :- 4
5) ‘दुष्काळ’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?
1) नापीक 2) सुकाळ 3) अवर्षण 4) कोरडा
उत्तर :- 2
6) या टोपीखाली दडलंय काय?
1) उभयान्वयी अव्यय 2) शब्दयोगी अव्यय
3) क्रियाविशेषण अव्यय 4) केवलप्रयोगी अव्यय
उत्तर :- 2
7) ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे !’ या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते.
1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय 2) न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय 4) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
उत्तर :- 2
8) केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण प्रकार किती ?
1) सात 2) आठ
3) नऊ 4) दहा
उत्तर :- 3
9) खालील वाक्यातील काळ ओळखा.
‘मधू लाडू खात जाईल’
1) साधा भविष्यकाळ 2) अपूर्ण भविष्यकाळ
3) पूर्ण भविष्यकाळ 4) रीती भविष्यकाळ
उत्तर :- 4
10) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – विदुषी
1) पुल्लिंगी 2) नपुंसकलिंगी
3) स्त्रीलिंगी 4) यापैकी नाही
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment