1) ‘सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन’ या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा.
1) सावकारशाही 2) राजेशाही
3) सामंतशाही 4) जमीनदारशाही
उत्तर :- 3
2) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?
1) आध्यात्मिक 2) अध्यात्मिक
3) आध्यात्मीक 4) अधात्मिक
उत्तर :- 1
3) मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे ?
1) क् 2) ण् 3) ळ 4) क्ष्
उत्तर :- 3
4) पुनर् + जन्म हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?
1) पुर्नजन्म 2) पूर्ण जन्म 3) पुनर्जन्म 4) पुनर्जम्न
उत्तर :- 3
5) अचूक विधाने निवडा.
अ) शब्द आणि पद हे एकसारखेच आहे.
ब) शब्दापासून पदे बनतात.
क) पदापासून शब्द बनतात.
1) फक्त अ अचूक 2) फक्त अ आणि क अचूक
3) फक्त ब अचूक 4) फक्त क अचूक
उत्तर :- 3
6) पुढील शब्दातील अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘इश्श’
1) उभयान्वयी 2) केवलप्रयोगी 3) शब्दयोगी 4) यापैकी नाही
उत्तर :- 2
7) ‘प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे – मेथीचे लाडू खात असते.’ – या वाक्प्रचाराचा काळ ओळखण्यासाठी खाली दिलेल्या
पर्यायातून योग्य तो पर्याय लिहा.
1) रीतिभूतकाळ 2) रीतिवर्तमानकाळ 3) रीति भविष्यकाळ 4) अपूर्ण वर्तमानकाळ
उत्तर :- 2
8) ‘भाजीपाला’ या शब्दाचे लिंग कोणते ?
1) स्त्रीलिंग 2) पुल्लिंग 3) नपुंसकलिंग 4) यापैकी नाही
उत्तर :- 2
9) जोडया जुळवा.
अ) व्दितीया 1) करण
ब) तृतीया 2) अधिकरण
क) चतुर्थी 3) कर्म
ड) सप्तमी 4) संप्रदान
वरील विभक्ती व कारक यांच्या जुळणीचा खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे ?
अ ब क ड
1) 3 4 1 2
2) 3 4 2 1
3) 3 1 4 2
4) 1 2 4 3
उत्तर :- 3
10) वाक्याचा प्रकार ओळखा. – ‘हिवाळयात पहाटे आकाशात दक्षिण दिशेला एक मोठा तारा चमकताना दिसतो.’
1) संयुक्त 2) मिश्र 3) केवल 4) मिश्रसंयुक्त
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment