1) पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यये व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय नाही?
1) विनी 2) खेरीज 3) देखील 4) निराळा
उत्तर :- 3
2) अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – ‘कांगारू म्हणून एक सस्तन प्राणी आहे.’
1) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय 2) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
3) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय 4) उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय
उत्तर :- 1
3) ठीक ! या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो.
1) प्रशंसा 2) विरोध 3) आश्चर्य 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
4) ‘मी निबंध लिहीत असतो.’ या विधानातील काळाचा प्रकार कोणता ?
1) साधा वर्तमानकाळ 2) अपूर्ण वर्तमानकाळ
3) पूर्ण वर्तमानकाळ 4) रीती वर्तमानकाळ
उत्तर :- 4
5) ‘वाघ’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
1) वाघिण 2) वाघिन 3) वाघ्रीन 4) वाघीण
उत्तर :- 4
6) ‘तो शाळेत पायी गेला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा.
1) कर्ता 2) अपादान 3) करण 4) अधिकरण
उत्तर :- 3
7) ‘सर्वांनी सकाळी लवकर उठावे’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?
1) संकेतार्थी 2) स्वार्थी 3) आज्ञार्थी 4) विध्यर्थी
उत्तर :- 4
8) खालील विधानातील उद्देश्यविस्तार स्पष्ट करणारा शब्द ओळखा.
‘शिवाजीचा भाऊ व्यंकोजी तंजावरास गेला.’
1) व्यंकोजी 2) शिवाजी 3) शिवाजीचा भाऊ 4) तंजावरास
उत्तर :- 3
9) ‘शिपायाकडून चोर धरला गेला.’ हे या प्रयोगातील वाक्य होय.
1) भावे 2) कर्मकर्तरी 3) कर्तृकर्तरी 4) कर्मणी
उत्तर :- 2
10) ‘पुरणपोळी’ या शब्दाचा अर्थ
1) पुरण भरलेली पोळी 2) पुरणाची पोळी
3) पुरण आणि पोळी 4) गूळ घालून केलेली पोळी
उत्तर :- 1
No comments:
Post a Comment