Tuesday 29 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) संधी म्हणजे काय?

   1) सांधणे    2) सांगणे      3) सामावणे    4) समजावणे

उत्तर :- 1

2) खालील शब्दांपैकी ................... हे भाववाचक नाव नाही.

   1) शांत    2) नवलाई    3) समता      4) धैर्य

उत्तर :- 1

3) खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे ?

   1) धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो.
   2) मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत: असतो.
   3) सावित्रीबाई सारं काम आटोपलं होतं.
   4) त्यांनी माझ्याकडून काम करवून घेतलं.

उत्तर :- 2

4) कोणतेही विशेषनाम .................. असते.

   1) अनेकवचनी    2) वचनहीन    3) एकवचनी    4) सामान्यज्ञान

उत्तर :- 3

5) खालील क्रियापदांपैकी साधित क्रियापद ओळखा.

   1) करवते    2) गडगडते    3) गेला      4) पाणावले

उत्तर :- 4 

6) क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार यांच्या जोडया लावा.

   अ) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय    I) पलीकडे
   ब) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय    II) मोजके
   क) रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय    III) क्षणोक्षणी
   ड) परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय    IV) सावकाश

    अ  ब  क  ड

         1)  II  IV  I  III
         2)  III  I  IV  II
         3)  II  IV  III  I
         4)  I  III  II  IV

उत्तर :- 2

7) खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते ?

   1) विषयी    2) योगे      3) संगे      4) साठी

उत्तर :- 1

8) ‘पळाला म्हणून तो बचावला’ या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे ?

   1) स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय      2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
   3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय    4) संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 2

9) वावा ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो.

   1) हर्षदर्शक    2) प्रशंसादर्शक    3) विरोधदर्शक    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

10) अपूर्ण वर्तमानकाळातील वाक्य ओळखा.

   1) मुले खेळत आहेत    2) मुले खेळली आहेत
   3) मुले खेळत असतात    4) मुले खेळत होती

उत्तर :- 1

No comments:

Post a Comment