Thursday 31 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आले आहे ?

   अ) मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली.
   ब) आम्ही उद्या सहलीला जाऊ
   क) जनतेला जागृत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे
   ड) तुम्ही आता सर्वजण घरी जा

   1) क      2) ड      3) ब      4) अ

उत्तर :- 4

2) ‘दुहेरी’ हा शब्द संख्याविशेषणाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहे ?

   1) क्रमवाचक    2) पृथक्त्ववाचक    3) आवृत्तीवाचक    4) गणनावाचक

उत्तर :- 3

3) ‘आजीने नातीला गोष्ट सांगितली’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

   1) सकर्मक क्रियापद  2) व्दिकर्मक क्रियापद  3) सहाय्यक क्रियापद  4) प्रायोजक क्रियापद

उत्तर :- 2

4) खालील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार ओळखा.
     ‘मामा येथे क्वचित येतात.’

   1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय      2) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
   3) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय      4) परिणाम दर्शक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 4

5) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘प्रमाणे’

   1) योग्यतावाचक  2) भागवाचक    3) हेतुवाचक    4) तुलनावाचक

उत्तर :- 1

6) खालील पर्यायी उत्तरांतील विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य कोणते आहे?

   1) लो. टिळक म्हणत, की ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे.’
   2) यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार.
   3) तो इतका खेळला, की त्याचे अंग दुखू लागले.
   4) माझा पहिला नंबर आला, की मी पेढे वाटीन.

उत्तर :- 2

7) खाशी ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो.

   1) शोक    2) प्रशंसा    3) विरोध      4) मौन

उत्तर :- 2

8) ‘मी पत्र वाचत असेन’ – काळ ओळखा.

   1) अपूर्ण भविष्यकाळ  2) पूर्ण भविष्यकाळ  3) उद्देश भविष्यकाळ  4) रीती भविष्यकाळ

उत्तर :- 1

9) मराठीतील ‘लिंग विचार’ पुढीलप्रमाणे करता येईल.

   अ) प्राणिमात्राचे लिंग हे वास्तविक असे असते.
   ब) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो.
   क) मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित आहे.

         पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा.

   1) अ, ब    2) ब, क      3) अ, क      4) ब, क

उत्तर :- 4

10) दृष्टी – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

   1) दृष्टी      2) नजारा    3) दृष्टया      4) दृष्टी

उत्तर :- 3

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...