Thursday, 3 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. – ज्याने हे भांडण उरकले, तो माघार घेईल.

   1) दर्शक सर्वनाम    2) संबंधी सर्वनाम   
   3) आत्मवाचक सर्वनाम    4) पुरुषवाचक सर्वनाम

उत्तर :- 2

2) ‘झाड पाडले’ या वाक्यात ‘पाडले’ या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

   1) संयुक्त क्रियापद    2) प्रयोजक क्रियापद
   3) अनियमित क्रियापद    4) शक्य क्रियापद

उत्तर :- 2

3) ‘मला बोलवत नाही’ अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा.

   1) प्रयोजक      2) शक्य     
   3) सहाय्यक      4) अकर्तृक
उत्तर :- 2

4) पर्यायी उत्तरांतील ‘अवधिवाचक कालवाचक क्रिया – विशेषण’ कोणते ?

   1) दिवसेंदिवस थंडी वाढतच गेली      2) पक्षीण क्षणोक्षणी पडत होती
   3) नेहमी त्यांचे असेच असते      4) तो कैकवेळा सांगूनही आला नाही

उत्तर :- 3

5) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – कोंडिबा झाडाखाली शांत झोपला होता.

   1) केवलप्रयोगी      2) क्रियाविशेषण   
   3) शब्दयोगी अव्यय    4) नाम

उत्तर :- 3

6) क्रियापद म्हणजे........................

   1) केवळ क्रियादर्शक शब्द      2) क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द
   3) क्रिया संपविणारा शब्द      4) वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द

उत्तर :- 4

7) क्रियाविशेषणाचे प्रकार व उदाहरणे यातील विसंगत जोडी ओळखा.

   अ) स्थलवाचक – लांबून, समोरून, मधून
   ब) कालवाचक – काही, कधीही, क्रमश:
   क) संख्यावाचक – अतिशय, दोनदा, पुष्कळ
   ड) रीतिवाचक – चटकन, आपोआप, भरभर

   1) फक्त अ बरोबर    2) फक्त ब बरोबर    3) फक्त क बरोबर    4) फक्त ड बरोबर

उत्तर :- 2

8) खालील गटातील शब्दयोगी अव्यये नसलेला गट ओळखा.

   1) घरावर, टेबलाखाली, ढगामागे      2) अथवा, किंवा, वा, अगर, की
   3) च, ही, मात्र, देखील, सुध्दा      4) कडून, पेक्षा, साठी, वर

उत्तर :- 2

9) ‘तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात’ या वाक्यातील ‘म्हणून’ या अव्ययास काय म्हणतात ?

   1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय    2) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
   3) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय      4) कारकबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 1

10) अयोग्य पर्याय निवडा.

   अ) केवलप्रयोगी अव्ययांना विभक्ती प्रत्यय नसतो.
   ब) केवलप्रयोगी अव्यय वाक्याचा भाग असतात.

   1) अ      2) ब      3) दोन्ही      4) दोन्ही नाही

उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...