1) माणसाने स्वार्थ व ............... चा विचार करावा. स्वार्थ शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?
1) आप्पलपोटी 2) प्रपंच
3) परमार्थ 4) पोटार्थ
उत्तर :- 3
2) समानार्थी म्हण शोधा. ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’
1) खाऊ जाणे तो पचवू जाणे 2) जशी कुडी तशी पुडी
3) यापैकी नाही 4) अंथरुण पाहून पाय पसरावे
उत्तर :- 3
3) ‘धिंडवडे निघणे’ या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ?
1) फजिती होणे 2) मिरवणूक निघणे
3) वडे तळणे 4) बोबडी वळणे
उत्तर :- 1
4) ‘हालअपेष्टा सहन करण्याचा गुण’ चा शब्दसमूहासाठी एक शब्द शोधा.
1) तितिक्षा 2) गरीब
3) दयाळू 4) मायाळू
उत्तर :- 1
5) शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.
1) महात्म्य 2) माहात्म्य
3) माहात्म 4) महात्म
उत्तर :- 2
6) शब्दाचा अर्थ व्यक्त करण्याच्या ................... शक्ती असतात. या वाक्यातील गाळलेला शब्द निवडा.
1) तीन 2) अनेक
3) दोन 4) चार
उत्तर :- 1
7) ‘पंकज’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.
1) चिखलात पडलेला 2) चिखलाने माखलेला
3) चिखलात जन्मलेला 4) चिखलाशी संबंध नसलेला
उत्तर :- 3
8) दिलेल्या शब्दाच्या विरुध्दार्थी शब्द निवडा. – ‘तडाग’
1) निर्झर 2) जलाशय
3) तळे 4) सरोवर
उत्तर :- 1
9) खालीलपैकी कोणत्या विधानात ‘नावडतीचे मीठ अळणी’ या म्हणीचा अर्थ सापडतो ?
1) नावडती माणसे शुध्द मनाची असतात 2) क्षुल्लक कारणांवरून दुस-यास दोष देणे
3) अप्रिय व्यक्तीची कोणतीच गोष्ट पटत नाही 4) मीठ कमी खाणारे अप्रिय ठरतात
उत्तर :- 3
10) ‘विचार न करता एखाद्याच्या मागून जाणे, परंपराशरणता’
हा अर्थ सुचविण्यासाठी योग्य वाक्प्रचार वापरा.
1) गतीवर येणे 2) गतानुगतिक
3) गण्यावरावण्याचे प्रसंग 4) गणचौथ पुजणे
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment