Tuesday, 29 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) नदी – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

   1) नद      2) नद्या      3) नदी      4) नदू

उत्तर :- 2

2) विभक्तीप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेले नामाच्या रूपाला ............... म्हणतात.

   1) साधित शब्द    2) संयुक्त व्यंजन    3) सामान्यरूप    4) संधी

उत्तर :- 3

3) ‘देवाने’ या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे ?

   1) प्रथम    2) व्दितीया    3) तृतीया    4) चतुर्थी

उत्तर :- 3

4) खालीलपैकी कोणते वाक्य ‍विधानार्थी नव्हे ?

   1) मुलांनो, शांतता पाळा      2) मुलांनो, किती गोंधळ घालत आहात
   3) मुलांनो, गोंधळ घालू नका    4) मुलांनो थोडे गप्प बसा

उत्तर :- 2

5) केवल वाक्याचे पृथक्करण करा. – शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.

   1) शरदाच्या चांदण्यात – विधेय विस्तार, गुलमोहर – उद्देश, मोहक – विधानपुरक, दिसतो – क्रियापद
   2) शरदाच्या चांदण्यात – उद्देश्य विस्तार, गुलमोहर – विधानपूरक, मोहक – उद्देश, दिसतो -‍ कर्म विस्तार
   3) शरदाच्या चांदण्यात – कर्म विस्तार, गुलमोहर – क्रियापद, मोहक – विधानपूरक,दिसतो – क्रियापद
   4) शरदाच्या चांदण्यात – उद्देश, गुलमोहर – विधानपूरक, मोहक – क्रियापद, दिसतो – विधेय

उत्तर :- 1 

6) पुढील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. – ‘मांजर उंदिर पकडते.’

   1) कर्मणी    2) कर्तरी      3) भावे      4) संकर

उत्तर :- 2

7) ‘गजाननाच्या कृपेने कार्यसिध्दी होवो’ – या वाक्यातील सामासिक शब्द कोणता ?

   1) गजानन    2) कृपेने      3) कार्यसिध्दी    4) होवो

उत्तर :- 1

8) खालीलपैकी विरामचिन्हांचा योग्य वापर केलेले वाक्य ओळखा.

   1) याज्ञवल्क्य म्हणाले, “मैत्रेयी, गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी आता वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे.”
   2) याज्ञवल्क्य म्हणाले : मैत्रेयी गृहस्थाश्रमाचा त्याग करून, मी आता वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे !
   3) याज्ञवलक्य म्हणाले, मैत्रेयी ! गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी आता वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे ?
   4) याज्ञवल्क्य म्हणाले, “मैत्रेयी गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी आता ; वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे.”

उत्तर :- 1

9) अलंकार ओळखा.

     येथे समस्त बहिरे बसतात लोक
     का भाषणे मधुर तू करिशी अनेक I
     हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक
     रंगावरून तुजला गणतील काक II

   1) अप्रस्तुत प्रशंसा  2) उपमा      3) श्लेष      4) प्रतीप

उत्तर :- 1

10) तत्सम शब्द निवडा.

   1) धरती     2) पृथ्वी      3) जमीन      4) धरा

उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...