1) ‘जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
1) स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्य 2) कालवाचक क्रियाविशेषण वाक्य
3) रीतिवाचक क्रियाविशेषण वाक्य 4) कार्यकारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य
उत्तर :- 2
2) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
स्तव
1) तुलनावाचक 2) हेतुवाचक 3) दिक्वाचक 4) विरोधवाचक
उत्तर :- 2
3) पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?
‘अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’
1) परिणामबोधक 2) स्वरूपबोधक 3) कारणबोधक 4) विकल्पबोधक
उत्तर :- 2
4) पुढील शब्द कोणत्या शब्दजातीतील ओळखा. – ‘फक्कड’
1) उभयान्वयी 2) केवलप्रयोगी 3) सर्वनाम 4) क्रियापद
उत्तर :- 2
5) ‘तो नेहमीच लवकर येतो’ या वाक्यातील काळ ओळखा.
1) वर्तमानकाळ 2) अपूर्ण वर्तमानकाळ
3) पूर्ण वर्तमान काळ 4) रीतिवर्तमान काळ
उत्तर :- 4
6) ‘सुताराने पाळणा केला’ – या वाक्यातील अधोरेखित शब्दास वाक्यपृथक्करणात काय म्हणतात ?
1) मूळ उद्देश्य 2) विधेय पूरक
3) उद्देश्य विस्तारक 4) मुळ विधेय
उत्तर :- 2
7) खालील पर्यायी उत्तरांतील भावे प्रयोग असणारे वाक्य कोणते ?
1) ती गाणे गाते 2) ती घरी जाते
3) तिने गाणे म्हटले 4) तिला घरी जाववते
उत्तर :- 4
8) या समासात व्दितीय पद प्रधान असतो त्याला ....................... समास म्हणतात.
1) व्दंव्द समास 2) कर्मधारय समास
3) तत्पुरुष समास 4) यापेक्षा वेगळे उत्तर
उत्तर :- 3
9) शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी कोणते चिन्ह वापराल.
1) स्वल्पविराम 2) पूर्णविराम
3) अर्धविराम 4) यापैकी नाही
उत्तर :- 2
10) खालीलपैकी देशी शब्द ओळखा.
1) इडली 2) लुगडे
3) समोसा 4) अथाणु
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment