Sunday, 20 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 सराव प्रश्न

1) अरेरे! फार वाईट झाले. या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

   1) शोकदर्शक    2) प्रशंसादर्शक   
   3) तिरस्कारदर्शक  4) यापैकी नाही

उत्तर :- 1

2) ‘तुम्ही पुढे व्हा, मी आलोच’ या विधानातील काळ ओळखा.

   1) वर्तमानकाळ    2) संनिहित भविष्यकाळ 
   3) भूतकाळ    4) अपूर्ण वर्तमानकाळ

उत्तर :- 2

3) ‘मीठभाकरी’ या शब्दाचे लिंग कोणते ?

   1) स्त्रीलिंग    2) पुल्लिंग   
   3) नपुंसकलिंग    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

4) काल आमच्या घरी खूप पाहूणे आले होते. या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत ?

   1) षष्ठी व प्रथमा    2) सप्तमी व प्रथमा   
   3) पंचमी व व्दितीया  4) षष्ठी व व्दितीया

उत्तर :- 2

5) कोल्ह्याला द्राक्षे आंबट – या म्हणीचा अर्थ योग्य पर्याय निवडून सांगा.

   1) कोल्हा मांस भक्षक असल्याने द्राक्षे खात नाही    2) न मिळणा-या गोष्टीला नावे ठेवणे
   3) कोल्ह्याला द्राक्षे आंबटच लागतात      4) कोल्ह्याला द्राक्षे आवडत नाहीत

उत्तर :- 2

6) ‘सुताराने पाळणा केला’ – या वाक्यातील अधोरेखित शब्दास वाक्यपृथक्करणात काय म्हणतात ?

   1) मूळ उद्देश्य      2) विधेय पूरक   
   3) उद्देश्य विस्तारक    4) मुळ विधेय

उत्तर  :- 2

7) खालील पर्यायी उत्तरांतील भावे प्रयोग असणारे वाक्य कोणते ?

   1) ती गाणे गाते      2) ती घरी  जाते   
   3) तिने गाणे म्हटले    4) तिला घरी जाववते

उत्तर :- 4

8) या समासात व्दितीय पद प्रधान असतो त्याला ....................... समास म्हणतात.

   1) व्दंव्द समास      2) कर्मधारय समास 
   3) तत्पुरुष समास    4) यापेक्षा वेगळे उत्तर

उत्तर :- 3

9) शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी कोणते चिन्ह वापराल.

   1) स्वल्पविराम    2) पूर्णविराम   
   3) अर्धविराम    4) यापैकी नाही

उत्तर :- 2

10) खालीलपैकी देशी शब्द ओळखा.
   1) इडली    2) लुगडे     
   3) समोसा    4) अथाणु

उत्तर :- 2

No comments:

Post a Comment