1) ‘तिने भिका-याला पैसा दिला’, हे वाक्य क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहे ?
1) विधानपूरक 2) फक्त सकर्मक 3) व्दिकर्मक 4) उभयविध
उत्तर :- 3
2) अ) त्याचे वागणे त्याच्या बोलण्याच्या बरोबर विरुध्द होते.
ब) सभेतील मतदानाच्या वेळी तिने ठरावाविरुध्द मत नोंदवले.
या दोन वाक्यातील अव्यये कोणती आहेत ?
1) शब्दयोगी व क्रियाविशेषण 2) क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी
3) दोन्ही शब्दयोगी 4) दोन्ही क्रियाविशेषण अव्यये
उत्तर :- 2
3) वाघ माझ्यासमोरून गेला – या वाक्यातील अव्ययाचा प्रकार निवडा.
1) उभयान्वयी अव्यय 2) शब्दयोगी अव्यय
3) क्रियाविशेषण अव्यय 4) केवलप्रयोगी अव्यय
उत्तर :- 2
4) ‘देह जावो अथवा राहो | पांडूरंगी दृढ भावो’
या संतवचनात .................... या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे.
1) विकल्पबोधक 2) न्यूनत्वबोधक 3) कारणबोधक 4) उद्देशबोधक
उत्तर :- 1
5) खालील किती शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यये आहे.
ऊं, ॲ:, अरेरे, अयाई, अगाई, हाय
1) पाच 2) चार 3) सर्व 4) तीन
उत्तर :- 3
6) योग्य पर्याय निवडा.
काव्यात ......................... विशेष महत्त्व असते.
1) व्यंगार्थाला 2) लक्ष्यार्थाला
3) वाच्यार्थाला 4) अभिधा
उत्तर :- 1
7) पुढीलपैकी वेगळा गट ओळखा.
1) मंगल – अमंगल 2) जबाबदार – बेजबाबदार
3) तक्रार – विनातक्रार 4) होकारार्थी – सकारार्थी
उत्तर :- 4
8) दिलेल्या पर्यायातून पुढील शब्दासाठी विरुध्दार्थी शब्द कोणता ? – ‘भंजक’
1) भयाण 2) भंगूर
3) विध्वंसक 4) निर्माता
उत्तर :- 4
9) ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ या म्हणीचा अर्थ –
1) सर्वांचे ऐकूणच काम करावे 2) सर्वांशी चर्चा करावी
3) काही करण्यापूर्वी लोकांना विचारावे 4) सर्वांचा विचार घ्यावा पण स्वत:ला योग्य वाटेल तेच करावे
उत्तर :- 4
10) अचूक वाक्प्रचाराचा पर्याय सुचवा : अंग टाकणे
1) पत्करणे 2) झाकणे
3) लपविणे 4) रोडावणे
उत्तर :- 4
No comments:
Post a Comment