1) ‘पिवळी गाय दूध देते’ या वाक्यातील उद्देश्य ओळखा.
1) गाय 2) पिवळी 3) दूध 4) देते
उत्तर :- 1
2) प्रयोग ओळखा – “तो बैल बांधतो” हे या प्रयोगातील वाक्य होय.
1) कर्तरी प्रयोग 2) भावे प्रयोग 3) कर्मणी प्रयोग 4) संकीर्ण प्रयोग
उत्तर :- 1
3) वैकल्पिक व्दंव्द समासाचे उदाहरण ओळखा.
1) मीठभाकर 2) गजानन 3) पापपुण्य 4) यापैकी कोणताच पर्याय नाही
उत्तर :- 3
4) यातील कोणते विरामचिन्ह अपसारण चिन्ह आहे ?
1) . 2) ? 3) “ “ 4) –
उत्तर :- 4
5) ‘उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन आले असता ............... अलंकार होतो.’
1) व्यतिरेक 2) अपन्हुती 3) अनन्वय 4) श्लेष
उत्तर :- 1
6) खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ?
1) तंबाखू 2) किल्ली 3) दादर 4) हापूस
उत्तर :- 2
7) शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळयासमोर येतो. ही ती शब्दशक्ती म्हणजे –
1) लक्षणा 2) व्यंजना 3) निरूढा 4) अभिधा
उत्तर :- 4
8) ‘पती’ या शब्दाच्या समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा :
1) प्रियकर 2) भ्रतार 3) जिवलग 4) सखा
उत्तर :- 2
9) ‘फिकट’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
1) फुकट 2) बिकट 3) गडद 4) चिक
उत्तर :- 3
10) ‘ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजवतो’ – या आशयासाठी पुढील कोणती म्हण योग्य आहे ?
1) पाचामुखी परमेश्वर 2) गाव करील ते राव काय करील
3) दिव्या खाली अंधार 4) बळी तो कान पिळी
उत्तर :- 4
No comments:
Post a Comment