1) पुढील शब्दाचे अनेकवचनी रुप ओळखा. – आज्ञा
1) आज्ञे 2) आज्ञा
3) आज्ञी 4) आज्ञाने
उत्तर :- 2
2) ‘देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?
1) प्रथमा 2) व्दितीया
3) तृतीया 4) सप्तमी
उत्तर :- 3
3) ‘कोणीही गडबड करू नका’ हे वाक्य होकारार्थी करा.
1) शांत बसणारे गडबड करीत नाहीत
2) गडबड करणारे शांत बसतात
3) काय ही गडबड ! 4) सर्वांनी शांत बसा
उत्तर :- 4
4) ‘पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात’ या वाक्यातील अधोरेखित शब्द .................. चे काम करतात.
1) उद्देश्यविस्तार 2) उद्देश्य
3) क्रियापद 4) विशेषण
उत्तर :- 1
5) खालील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा.
– आईने मधुराला बोलावले.
1) कर्तरीप्रयोग 2) भावे प्रयोग
3) कर्मणीप्रयोग 4) संकीर्ण प्रयोग
उत्तर :- 2
6) ‘विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला.’ या वाक्यातील उद्देश्य कोणते?
1) जेथे 2) अंत
3) झाला 4) विजयनगरच्या साम्राज्याचा
उत्तर :- 2
7) खालील वाक्याचा प्रयोग सांगा. ‘पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे.’
1) कर्तरी प्रयोग 2) भावे प्रयोग 3) कर्मणी प्रयोग 4) संकीर्ण प्रयोग
उत्तर :- 1
8) रिकाम्या जागी अचूक पर्याय शोधा.
दोन्ही पदे समान दर्जाची असतात त्याला ............................ समास म्हणतात.
1) व्दंव्द समास 2) बहुव्रीही समास
3) कर्मधारय समास 4) मध्यमपदलोपी समास
उत्तर :- 1
9) योग्य जोडया निवडा.
अ) पूर्ण विराम - शब्दांचा संक्षेप दाखविण्याकरिता
ब) स्वल्प विराम - संबोधन दर्शविताना
क) अपूर्ण विराम - वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास
1) अ 2) अ, ब 3) अ, क 4) सर्व
उत्तर :- 4
10) खाली दिलेल्या शब्दांपैकी अभ्यस्त शब्द ओळखा.
1) गारगार 2) गिरकी 3) गार 4) गरम
उत्तर :- 1
No comments:
Post a Comment