1) ‘पाऊस सगळीकडे पडला बरं का’ क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा.
1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय 2) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
3) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय 4) परिणामदर्शक क्रियाविशेषण अव्यय
उत्तर :- 3
2) शब्दयोगी अव्यये पुढीलपैकी कोणत्या शब्दजातीला जोडून येतात ?
1) नाम 2) क्रियापदे 3) क्रियाविशेषणे 4) वरील सर्व पर्याय बरोबर
उत्तर :- 4
3) अधोरेखित शब्दाची जात ओळखा – ‘भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले.’
1) गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय 2) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय
3) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय 4) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
उत्तर :- 4
4) अबब ! या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो.
1) संमती 2) आश्चर्य 3) विरोध 4) संबोधन
उत्तर :- 2
5) ‘तो नेहमीच उशिरा येत असतो.’ या वाक्यातील काळ ओळखा.
1) साधा वर्तमानकाळ 2) रीती भविष्यकाळ
3) रीती भूतकाळ 4) रीती वर्तमानकाळ
उत्तर :- 4
6) ‘वानर’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
1) माकड 2) वानरी 3) माकडीण 4) बोका
उत्तर :- 2
7) लाली – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा..
1) लाल्या 2) लाले 3) लाली 4) लाल
उत्तर :- 3
8) पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचे असलेले ‘विशेषणाचे सामान्यरूप’ होणारे विशेषण कोणते आहे ?
1) गरीब 2) भला 3) लोकरी 4) खेळू
उत्तर :- 2
9) ‘पोपट पेरू खातो’ या वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीत आहे.
1) तृतीयान्त 2) चतुर्थ्यन्त 3) व्दितीयान्त 4) प्रथमान्त
उत्तर :- 4
10) तुमच्या परीक्षा कधी सुरू होणार ? – ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?
1) विध्यर्थी 2) प्रश्नार्थी 3) उद्गारार्थी 4) विधानार्थी
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment