1) खालीलपैकी कोणते पिके अत्यंत आम्लधर्मीय मृदेस सहनशील आहेत.
1) एरंड, भात, ओट 2) गहू, भात, वांगी
3) मका, भात, टोमॅटो 4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर :- 1
2) योग्य जोडया लावा.
वारे स्थान
अ) गरजनारे चाळीस i) 50º द. अक्षवृत्त
ब) शूर पश्चिमी वारे ii) 5º उ. ते 5º द. अक्षवृत्त
क) उन्मत साठ iii) 40º द. अक्षवृत्त
ड) निर्वात पट्टा iv) 60º द. अक्षवृत्त
अ ब क ड
1) i iii iv ii
2) iii i iv ii
3) iv iii ii i
4) i ii iii iv
उत्तर :- 2
3) खालीलपैकी कोणते एक विधान उंची परत्वे सरासरी तापमानातील होणारी घट बरोबर दर्शविते ?
1) 1º सें.दर 160 मी. ला 2) 1º सें. दर 170 मी. ला
3) 1º सें. दर 100 मी. ला 4) 1º सें. दर 260 मी. ला
उत्तर :- 1
4) योग्य जोडया लावा.
वातावरणाचे थर उंची
अ) तापांबर i) 500 ते 1050 किमी
ब) स्थितांबर ii) 16 ते 50 किमी
क) आयनांबर iii) 0 ते 16 किमी
ड) बाह्यांबर iv) 80 ते 500 किमी
अ ब क ड
1) iii ii i iv
2) ii iv i iii
3) iii ii iv i
4) i iii iv ii
उत्तर :- 3
5) जेव्हा हवामान अंदाजाची उपयुक्तता 3 ते 10 दिवस असते, तो ..................
1) कमी कालावधीचा हवामान अंदाज
2) मध्यम कालावधीचा हवामान अंदाज
3) जास्त कालावधीचा हवामान अंदाज
4) वरील सर्व
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment