🏆 संरक्षण 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
INS तीर, INS सुजाता, INS शार्दुल आणि ICGS सारथी या ठिकाणी आयोजित प्रथम ट्रेनिंग स्क्वॉड्रॉन या कार्यक्रमासाठी दाखल झाले - मोम्बासा, केनिया.
🏆 अर्थव्यवस्था 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
क्युरेटेड तंत्रज्ञान आणि बँकिंग उपाययोजनांच्या माध्यमातून MSME उद्योगांच्या संघांच्या व्यवहारांना डिजिटल करण्यासाठी येस बँकेनी तयार केलेले अॅप - 'येस स्केल' बिझकनेक्ट.
🏆 आंतरराष्ट्रीय 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2019 या काळात आयोजित करण्यात आलेल्या ‘C40 जागतिक महापौर शिखर परिषद 2019’ या कार्यक्रमाचे ठिकाण - कोपेनहेगन, डेन्मार्क.
जागतिक आर्थिक मंचच्या (WEF) ‘जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2019’ यामध्ये पहिले स्थान - सिंगापूर (अमेरिका द्वितीय).
सर्वात शक्तिशाली पासपोर्ट (पारपत्र) म्हणून हेन्ले अँड पार्टनर्स या संस्थेच्या ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स 2019’ यामध्ये पहिले स्थान - जापान आणि सिंगापूर (दक्षिण कोरिया, फिनलँड आणि जर्मनी द्वितीय स्थानावर आहेत).
दुबईत ‘2019 टेलीकॉम्स वर्ल्ड मिडल ईस्ट अवॉर्ड्स’ सोहळ्यात ‘डिजिटल कंटेंट सर्विस ऑफ द इयर’ हा सन्मान जिंकणारा भारतीय उद्योग – ZEE5 ग्लोबल.
अमेरिकेचा ‘2019 सेक्रेटरी ऑफ स्टेट्स अवॉर्ड फॉर कॉर्पोरेट एक्सिलन्स’ हा पुरस्कार प्राप्त करणारा भारतीय उद्योग - पेप्सीको इंडिया (17 अब्ज लिटरपेक्षा जास्त पाणी वाचविण्यासाठी).
🏆 राष्ट्रीय 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जागतिक आर्थिक मंचच्या (WEF) ‘जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2019’ यामध्ये भारताचा क्रमांक – 68 वा.
हेन्ले अँड पार्टनर्स या संस्थेच्या ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स 2019’ यामध्ये भारताचा क्रमांक – 82 वा.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आफ्रिकेतल्या या देशांचा समावेश करण्यासाठी ‘कापूस तांत्रिक सहाय्य कार्यक्रम (TAP)’ याचा दुसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली - माली, घाना, टोगो, झांबिया आणि टांझानिया.
बंगळुरुच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे 9 ऑक्टोबर रोजी प्रारंभ करण्यात आलेला शैक्षणिक उपक्रम - प्रधान मंत्री अभिनव शैक्षणिक कार्यक्रम - ‘ध्रुव (DHRUV)’.
🏆 व्यक्ती विशेष 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
रसायनशास्त्रामधील 2019 नोबेल पुरस्काराचे विजेता -
📌जॉन गुडइनफ (अमेरिका),
📌 स्टेनली व्हिटिंगहॅम (अमेरिका) आणि
📌अकिरा योशिनो (जापान) (लिथियम-आयन बॅटरीच्या विकासासाठी).
मुंबई विद्यापीठातून जर्मन अभ्यासात PhD पूर्ण करणारी जगातली पहिली अंध विद्यार्थी - उर्वी जंगम.
🏆 क्रिडा 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग 18 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम नोंदविणारा महिला क्रिकेट संघ - ऑस्ट्रेलिया.
🏆 विज्ञान व तंत्रज्ञान 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
संख्येत सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह - शनी (82 चंद्र).
🏆 सामान्य ज्ञान 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
C40 शहरे समूह – स्थापना: सन 2005; सचिवालय: लंडन (ब्रिटन).
युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) - स्थापना: सन 1874 (09 ऑक्टोबर); मुख्यालय: बर्न, स्वित्झर्लंड.
जागतिक टपाल दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडणारा व्यक्ती - आनंद मोहन नरुला (भारतीय).
एखाद्या क्षेत्रात चार किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास प्रतिबंधित करणारे 1973 सालाच्या फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) मधले कलम - कलम 144.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज - स्थापना: सन 1875; स्थळ: दलाल स्ट्रीट, मुंबई.
भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ (Federation of Indian Chambers of Commerce and Industry -FICCI) याची स्थापना – सन 1927.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment