Monday, 9 September 2019

WEFच्या प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत 34 व्या क्रमांकावर


जागतिक आर्थिक मंचाने (WEF) त्याचा ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता अहवाल’ प्रसिद्ध केला आहे, ज्यात जागतिक पातळीवर पर्यटनासंबंधीची 140 देशांची क्षमता नमूद करण्यात आली आहे.

अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक (TTCI) 2019’ या यादीत भारत आपल्या समृद्ध नैसर्गिक आणि सांस्कृतिक संसाधनांमुळे सहा जागांची उडी घेत 34 व्या क्रमांकावर आला आहे.

मुख्य बाबी👇👇👇

🔸भारत यादीतल्या अव्वल 35 देशांमध्ये असणारा एकमेव अल्प-मध्यम उत्पन्न असलेला देश आहे. हवाई पायाभूत सुविधा (33) आणि भू आणि बंदरे पायाभूत सुविधा (28), आंतरराष्ट्रीय मुक्तता (51), नैसर्गिक (14) आणि सांस्कृतिक संसाधने (8) या घटकांच्या बाबतीत भारताने चांगली प्रगती दर्शविलेली आहे.

🔸यादीत स्पेन हा देश अव्वल स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ फ्रान्स, जर्मनी आणि जापान या देशांचा क्रमांक लागतो आहे.

🔸या वर्षीच्या क्रमवारीत आशिया-प्रशांत क्षेत्र प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता या बाबतीत सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या क्षेत्रापैकी एक होता. जापान हे देश आशियातली सर्वाधिक स्पर्धात्मक प्रवास व पर्यटन अर्थव्यवस्था ठरली असून त्याचा जगभरात चौथा क्रमांक लागतो आहे.

WEF बाबत

जागतिक आर्थिक मंच (World Economic Forum) हे एक स्विस ना-नफा प्रतिष्ठान आहे. याचे संस्थापक क्लाउस श्वाब यांनी सन 1971 मध्ये युरोपियन मॅनेजमेंट फोरम या नावाने स्थापना केली. याचे मुख्यालय जिनेव्हा, स्वीत्झर्लंड येथे आहे. ही सार्वजनिक-खासगी सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून स्विस प्रशासनाकडून मान्य करण्यात आलेली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...