🅱 अत्यंत चुरशीच्या सामन्यात अथर्व अंकोलेकरने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला ५ धावांनी पराभूत करत १९ वर्षांखालील आशिया चषकाचे विजेतेपद मिळवले आहे.
🅱भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये अखेरचा सामना कोलंबो येथे रंगला होता.
🅱आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी १०६ धावांचे आव्हान ठेवले होते.
🅱 या सामन्यात बांगलादेश सहज विजय मिळवेल, असेच सर्वांना वाटले होते. मात्र, डावखुरा फिरकीपटू अथर्व अंकोलेकरने २८ धावांत टिपलेल्या ५ गड्यांमुळे भारताने जेतेपदावर नाव कोरले.
🅱बांगलादेशचा संपूर्ण संघ १०१ धावांवर बाद झाला.
🅱 दरम्यान, १९ वर्षांखालील भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.
🅱नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय चुकीचा ठरला.
🅱अखेर भारताचा संपूर्ण संघ ३२.४ षटकामध्ये १०६ धावाच करू शकला.
No comments:
Post a Comment