Saturday, 19 August 2023

माहितीचा अधिकार कायदा (RTI - Right to Information Act)

 माहितीचा अधिकार कायदा स्वीकारण्यामध्ये जगातील पहिला देश स्वीडन हा ठरला आहे.

 1766 मध्ये फ्रिडम ऑफ प्रेस अक्ट असा कायदा करून स्वीडने महितीचा अधिकार सर्वप्रथम मान्य केला.

 स्वीडननंतर डेन्मार्क, फीनलँड व नॉर्वे या देशांनी माहितीच्या अधिकारचे कायदे केले.

 1966 साली अमेरिकेत 'फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन अॅक्ट' स्वीकारण्यात आला.

 1966 मध्ये ब्रिटनने महितीचा अधिकार स्वीकारला....

 1982 च्या दरम्यान कॅनडा, फ्रान्स व ऑस्ट्रेलिया या राष्ट्रकुलातील देशांनी माहितीच्या अधिकाराचा पुरस्कार केला.

 1990 पर्यंत जगातील 13 राष्ट्रांनी माहितीचा अधिकार कायदा लागू केला होता.

 १९९० नंतर भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू केला होता...

 28 डिसेंबर 2005 रोजी चीनने 'द फ्रीडम ऑफ गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन ऑफ लॉ' असा कायदा लागू केला..

 जागतिक माहिती अधिकार सप्ताह 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत असतो.

 महाराष्ट्र माहिती अधिकार दिन 28 सप्टेंबर हा असतो.

 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त केंद्र सरकारने माहितीचा अधिकार हा कायदा संपूर्ण भारतात 12 ऑक्टोबर 2005 रोजी लागू केला.

 माहितीचा अधिकार हा कायदा एकूण 31 कलमांचा आहे. या कायद्यातील कलम 12 नुसार, केंद्रीय माहिती आयोगाची रचना केली आहे.

 केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना 2005 साली करण्यात आली. याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.

 आयोगात 1 मुख्य माहिती आयुक्त असतो. तर जास्तीत जास्त इतर 10 माहिती आयुक्त असतात.

 केंद्रीय माहिती आयुक्तांचा दर्जा निवडणूक आयुक्तांसारखा असतो. यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण करेपर्यंत असतो.

 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांना दरमहा 90000 इतके वेतन असते.

 भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबिबुल्लाह हे होते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...