Wednesday, 11 September 2019

पियुष गोयल थायलंडमध्ये आयोजित RECPच्या मंत्रिस्तरीय बैठकीत उपस्थित

​​

8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2019 या काळात थायलंड देशांची राजधानी बँकॉकमध्ये सातवी RCEP मंत्रिस्तरीय बैठक, सोळावी ASEAN-भारत आर्थिक मंत्री बैठक आणि सातवी पूर्व आशिया आर्थिक मंत्री शिखर परिषद 2019 हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांमध्ये भारताच्यावतीने केंद्रीय वाणिज्य व उद्योग व रेल्वे मंत्री पियुष गोयल उपस्थित आहेत.

✅ RCEP बद्दल

प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (Regional Comprehensive Economic Partnership -RCEP) हा आग्नेय आशियाई देशांचा संघ (ASEAN)

याचे दहा सदस्य (ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलँड, व्हिएतनाम) आणि त्याचे सहा FTA भागीदार (चीन, जपान, भारत, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड) यांच्या दरम्यानचा एक प्रस्तावित मुक्त व्यापार करार (FTA) आहे. नोव्हेंबर 2012 साली कंबोडियात झालेल्या ASEAN शिखर परिषदेत RCEP वाटाघाटी औपचारिकपणे लागू झाली. RCEP हा जगातला सर्वात मोठा आर्थिक गट आहे आणि जवळपास निम्मी जागतिक अर्थव्यवस्था या गटात समाविष्ट आहे. या भागात 3.4 अब्ज लोकसंख्या असून एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP, PPP) 49.5 लक्ष कोटी डॉलर इतके आहे.

✅ ASEAN आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ (Association of Southeast Asian Nations -ASEAN): हा विविध स्वरुपात आर्थिक आणि विकास क्षेत्रांमध्ये सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी ब्रुनेई दरुसालेम, कंबोडिया, म्यानमार, मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, लाओ PDR, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या राष्ट्रांचा क्षेत्रीय आंतरसरकारी समूह आहे. याची निर्मिती मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड या देशांनी दिनांक 8 ऑगस्ट 1967 रोजी केली आणि याचे मुख्यालय जकार्ता (इंडोनेशिया) येथे आहे. ASEAN हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकृत निरीक्षक आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...